१०० कोटींचा लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाल्याबद्दल भाजपकडून आरोग्य विभागाचा सन्मान


आळंदी 

कोरोनाच्या महामारीच्या संकटात भारताने आज नव्या विक्रमाची नोंद केली आहे.भारताने आज लसीकरणाच्या अभियानाअंतर्गत १०० कोटींचा कोरोनाविरोधी लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. तब्बल १०० कोटी डोसच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करणारा असा भारत देश जगभरातील दुसरा देश ठरला आहे. या लक्ष्यपूर्तीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार आळंदी शहर भाजप कडून लसीकरणासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे आरोग्य विभाग आणि आळंदी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी आळंदी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणपत जाधव,पश्चिम महाराष्ट्र भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष हभप संजय घुंडरे,कामगार नेते अरुण घुंडरे,नगरसेवक सागर भोसले,भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे,कार्याध्यक्ष बंडूनाना काळे,उपाध्यक्ष चारूदत्त प्रसादे,सरचिटणीस सदाशिव साखरे,युवा मोर्चा अध्यक्ष आकाश जोशी, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे,बाळासाहेब पेठकर उपस्थित होते.

लसीकरणाचे कौतुक करताना संजय घुंडरे यांनी सांगितले की अतिशय कमी वेळात मजबूत अशा राजकीय नेतृत्वात,आंतर क्षेत्रीय अभिसरणाच्या प्रक्रियेतून तसेच फ्रंटलाईन वर्कर्सच्या कामाच्या वेगाशिवाय लसीकरणाचा टप्पा गाठणे शक्य झाले नसते.भारतातील संपुर्ण प्रगतीला एकप्रकारे लसीकरणाच्या मोहिमेतील उदिष्टपूर्तीचे यश म्हणून पाहिले जाणे गरजेचे आहे.लसीकरण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कठोर परिश्रम घेतले असे आरोग्य विभागाचे आणि आळंदी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या