अतिवृष्टीची मदत मात्र तुटपुंजी ; आ. राजळे


शेवगाव प्रतिनिधी 

शेवगाव - पाथर्डी तालुक्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व त्यामुळे आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले अशी परिस्थिती यापूर्वी कधीही झाली नव्हती. यामध्ये शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पशुधन वाहून गेले तर काही जागेवर मृत पावले, शेती खरडून वाहून गेली झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात होते.

यावेळी शेवगाव तालुक्यात 26 कोटीचे तर पाथर्डी तालुक्यात 17 कोटीचे नुकसानीचे पंचनामे करून मागणी करण्यात आली परंतु शासनाने या मागणीला कात्री लावत शेवगाव तालुका साठी 16 कोटी 35 लाख तर पाथर्डी तालुक्यासाठी सहा कोटी ला मंजुरी दिली. यामध्ये पहिल्या टप्प्यात शेवगाव तालुक्यात पाच कोटी 90 लाख तर पाथर्डी तालुक्यात पाच कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप दिवाळीपूर्वी करण्याचे प्रशासनाचा प्रयत्न असेल असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

खामगाव येथील आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गतील हनुमान मंदिरासमोरील सभामंडपाच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. 

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, बापूसाहेब पाटेकर,  महिला आघाडी अध्यक्षा आशाताई गरड, उमेश भलसिंग, भीमराज सागडे,  कचरू चोथे,  गंगा खेडकर, वाय डी कोल्हे, संदीप खरड, सुभाष बरबडे, महादेव पवार, राजेंद्र घोलप,  डॉ शाम काळे, सोपान वडणे, रमेश कळमकर, विठोबा वाघमोडे, राजेंद्र पालवे, बशीर पठान, सुरेश बडे, राम गिरमकर, गणेश सामृत, उषा बडधे विठ्ठल रांजणे, दिगंबर बडधे, शेषराव बडधे, तुकाराम वाघमारे, सुखदेव तुजारे, मधुकर जाधव, बडे मिस्तरी आदी मान्यवर उपस्थित होते. 

आ.राजळे यांच्या पाठपुराव्यातून शेवगाव तालुक्यातील भायगाव येथे लेखाशीर्ष २५१५ अंतर्गातील दुकळे वस्ती वस्ती रस्ता भूमीपूजन, बोधेगाव येथे जिल्हा नियोजन अंतर्गतील एकबुर्जी वस्ती रस्ता भूमिपूजन, नवीन दहिफळ येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ह्नुमान मंदिरापुढे सभामंडप भूमीपूजन कार्यक्रम या कार्यक्रमानंतर पार पडले. 

यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या राज्य शासनाने  शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलाची रक्कम त्यांच्या ऊसाच्या पेमेंट मधून वसूल करण्याचा फतवा काढला आहे. भाजपा शासनाच्या कालावधीत बिलासाठी कधीही शेतकऱ्याची वीज बंद करण्याचे पाप केले नाही, शेतक-यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सुरू करणाऱ्यां शासनाचा शेतकऱ्याविषयीचे प्रेम खोटे असल्याचे दिसते.  राज्य शासनाने शेतकरी व जनतेचा विश्वासघात चालविल्याची  घणघणाती टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन बडधे यांनी केले तर आभार उपसरपंच सुभाष बडधे यांनी मानले


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या