माई फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर


बारामती 

कोरोना सारख्या संसर्गजन्य व्हायरसने जगभरात थैमान घातले असून कोरोना काळात जगभरात रक्ताचा देखील तुटवडा भासत आहे.आणि कोरोनाच्या या संसर्गजन्य रोगाच्या काळातही माई फाऊंडेशन ट्रस्ट व समस्त काळे परिवाराच्या वतीने (दि:१७) रोजी कै.बाजीराव काळे नगर या ठिकाणी शासकीय नियमांचे पालन करत रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी आयोजित शिबिरामध्ये ११६ बाटल्यांचे रक्त संकलित करण्यात आले.

सध्या बारामतीमध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. यामुळे गरजूंना रक्ताची गरज भासल्यास बाहेरगावी जावे लागते. यामुळे हीच नागरिकांची गरज ओळखून 

माई फाऊंडेशनच्या व काळे मित्र परिवाराच्या शंभर पेक्षा जास्त युवा शिलेदारांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना रियल मी कंपनीचा ब्लुटूथ हेडसेट गिफ्ट देण्यात आले. 

या रक्तदान शिबिरांमध्ये तब्बल ११६ बाटल्यांचे रक्त संकलन झाले असल्याची माहिती माई फाऊंडेशनचे सचिव रियाज खान यांनी दिली.

यावेळी माई फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड.वैभव काळे, सचिव- रियाज खान,व तुषार काळे तसेच समस्त काळे परिवारांच्या युवा शिलेदार व मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या