भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने अमित शहांची घेतली भेट

साखर उद्योगाविषयी चर्चा


इंदापूर  प्रतिनिधी

नवी दिल्लीत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.१९) भेट घेतली. या भेटीत साखर उद्योगा प्रश्नी सकारात्मक चर्चा झाली.

राज्यातील साखर कारखान्यांना आलेल्या आयकर विभागाच्या नोटिसा व सहकारी साखर कारखान्यांना करावयाच्या मदती संदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय महाडीक, राहुल कुल, पृथ्वीराज देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, मदन भोसले आदी उपस्थित होते. या बैठकीमुळे राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल,असे बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या