खड्डे दुरुस्ती साठी विरोधकांचे सभागृहात आंदोलन


पुणे

रस्त्यांवर पडलेल्या खड् दुरूस्ती करण्यासाठी महापालिकेतील विरोधी नगरसेवकांनी सोमवारी मुख्यसभेत फलक फडकवून आंदोलन केले. यावेळी प्रशासनाने पाहणी करून रस्त्याच्या दुरूस्तीसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले.

महापालिकेची मुख्यसभा सुरू होताच राष्ट्रवादीचे नगरसेवक गफुर पठाण यांनी फलक फडकवत कोंढवा परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. राष्ट्रवादीसह शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनीही रस्त्यांवरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापौरांसमोरील जागेत येवून आंदोलन केले. वापसाने उघडीत दिलेली असतानाही रस्त्यांवरील खड्डे दुरूस्त केले जात नसल्याने प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी केली. यानंतर पालिका अतिरीक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करून आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्याचे व खड्डे दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या