सचिन सावंतांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा


मुंबई

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नव्या नियुक्त्यांमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी सुरू झाली असून सचिन सावंत हे नाराज झाले असून त्यांनी पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. मोदी सरकारचे कडवे टीकाकार म्हणून सावंत ओळखले जातात. आता त्यांनी हायकमांडला थेट पत्र लिहून प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली.

गेल्या १० वर्ष सचिन सावंत यांनी पक्षाचे मीडिया इंचार्ज म्हणून काम केले. काँग्रेसची नेमकी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि भाजपला सडेतोड उत्तर देण्याचं कामही सावंत करत होते.तसेच पक्ष चर्चेत ठेवण्याचंही काम त्यांनी केले होते. अशात नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना डावलण्यात आले. त्यातच पक्षात मुख्य प्रवक्तेपद तयार करून त्या पदावर सचिन सावंत यांना डावलून अतुल लोंढेची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. पटोलेंनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले होते. अतुल लोंढेची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली. आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी माजी मंत्री सुनिल देशमुख यांच्याकडे देण्यात आली. सोशल मीडिया विभागाची जबाबदारी विशाल मुत्तेमवार यांच्याकडे आणि निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी रमेश शेट्टी आणि प्रशिक्षण विभागाची जबाबदारी माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्याकडे देण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या