विराट-रोहितमध्ये मैदानावरच राडा!


दुबई 

रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कर्णधारपद देण्यात आले होते. पण हा सामना सुरु असतानाच विराट आणि रोहित यांच्यामध्ये कर्णधारपदावरुन राडा सुरु असल्याचे पाहायला मिळाले. सामना सुरु झाल्यापासून रोहित आणि विराट यांच्यांतील शीतयुद्ध मैदानात पाहायला मिळाले.

या सामन्याच्या नाणेफेकीचा वेळी रोहित शर्माने सांगितले होते की, आजच्या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. पण जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा रोहितच्या मागून कोहलीही मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. साधारणत: कर्णधार पहिल्यांदा मैदानात उतरत असतो. पण या सामन्यात कोहलीला मैदानात पहिल्यांदा उतरता आले नाही, त्यामुळेही या दोघांमध्ये सामना सुरु होण्यापूर्वी वाद झाल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे रोहित शर्माने सातव्या षटकासाठी विराटकडे चेंडू दिला आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. जर विराटकडे कर्णधारपद नसले तर रोहित त्याच्याबरोबर काय करू शकतो, असेही चाहते यावेळी म्हणत होते. त्याचबरोबर या सामन्यात रोहित कर्णधार असला तरी विराटचं यष्टीरक्षण लावत असल्याचे पाहायला मिळत होते. काहीवेळी कर्णधार लांब असताना एखादा खेळाडू क्षेत्ररक्षण लावताना सर्वांनी पाहिले आहे. पण रोहित शर्मा समोर असतानाच विराट संघाचे क्षेत्ररक्षण लावत असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर कर्णधार सामना सुरु असताना गोलंदाजांना बऱ्याचदा सुचना करत असतो किंवा क्षेत्ररक्षण बदलायचे असेल तर त्याच्याशी चर्चा करतो. पण रोहित कर्णधार असला तरी या सामन्यात विराट गोलंदाजांबरोबर चर्चा करत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रोहितला आजच्या सामन्यात फक्त नावालाच कर्णधार केले होते आणि सर्व अधिकार कोहलीकडेच देण्यात आले होते का, असा प्रश्न चाहते विचारत आहे. विश्वचषकानंतर कोहली कर्णधारपदावर राहणार नाही, त्यानंतर रोहितच्याच नावावर कर्णधारपद होणार आहे. त्यावेळी कोहली असेच करत राहीला तर संघामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे या गोष्टी जर आत्ताच थांबवण्यात आल्या तरच त्या संघासाठी हितकारक असतील. पण आजच्या सामन्यातील हे सर्व प्रकार पाहून भारतीय संघात उभी फूट पडली आहे का, असा सवाल चाहते विचारत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या