ब्रिटीश कालीन रेल्वे पुल बनला धोकादायक

भगदाड पडल्याने भीषण अपघाताची शक्यता!


पाटस 

पुणे सोलापूर जिल्हायाला जोडणारा आणि उजनी धरणावर असलेला ब्रिटिश कालीन जूना रेल्वे पूलाला मोठे भगदाड पडू लागल्याने आणि या पुलाचे दगडी बांधकामाला भेगा पडू लागल्याने सध्या हा पुल अंत्यत धोकादायक बनला आहे. या ठिकाणी मोठा भिषण अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाने या घटनेकडे त्वरीत लक्ष घालून या पुलाची तात्पुरती दुरूस्ती करावी,अशी मागणी कोंढार चिंचोलीचे माजी सरपंच देविदास साळुंखे यांनी निवेदन द्वारे केली आहे. 

इंदापुर तालुक्यातील भिगवण जवळील डिकसळ आणि करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली या हद्दीतील आणि पुणे, सोलापुर, नगर जिल्हयाला जोडणारा उजनी धरणाच्या पाण्यासाठ्यात असेलला जूना ब्रिटीश कालीन रेल्वे पुल सध्या अंत्यत धोकादायक बनला असून तो केंव्हाही पडण्याच्या अवस्थेत आहे.सध्या उजनी धरणात पाणी साठा शंभर टक्केच्या पुढे भरल्याने उजनी धरणाचे पाणी या पुलाच्या दोन्ही बाजूने कठडेच्या बरोबरीने आले आहे. तर या पुलाच्या आतील बाजूस मोठे भडदड पडल्याने मोठा खड्डा पडला आहे. तसेच या पुलाचे दगडी बांधकामास भेगा पडू लागल्या आहेत. या पुलाची मुदत कधीच संपली असून हा पुल वाहतुकीस धोकादायक असल्याचा फलक ही सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी लावला आहे. 

मात्र तरीही या पुलावरून धोकादायक जड वाहुतक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. या पुलावर तसेच दोन्ही बाजूला एक किलो मिटर अंतरापर्यंतचा रस्ता अंत्यत खराब आहे.तसेच काही लोकांनी या पुलावर मुरूमाचे ढिग टाकून 

वाहुतुकीस अडथळा केला आहे. या पुलामुळे इंदापुर, दौंड, कर्जत, करमाळा या तालुक्यातील गावांना दळवळण करणारा आणि नगर,सोलापूर पुणे,या जिल्हयांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. मात्र सध्या हा ब्रिटीश कालीन पुल अंत्यत धोकादायक अवस्थेत बनला असून तो केंव्हाही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपुर्वी करमाळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी या पुलाची पाहणी केली आहे. मात्र अद्याप पर्यंत सार्वजनिक बांधकाम 

विभागाने भगदाड पडलेल्या ठिकाणी दुरूस्ती केली नाही. तसेच दोन्ही बाजूला जडवाहतूक रोखण्यासाठी मोठी कमान उभारली नाही. 

या पुलावरून जड वाहतुक त्वरीत थांबावावी,जड वाहतुक न थांबल्यास अपघात होवून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागातील 20 ते 25 गावांचा दळणवळणाची मोठी गैरसोय होणार नाही याची दक्षता संबंधितीत विभागाने घ्यावी. दक्षता न घेतल्यास सावित्रा नदीवरील पुलाची जशी दुर्घटना घटना घडली तशा प्रकराची घटना होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. अशा घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभागाने गांर्भीयाने  लक्ष घालून सदर ठिकाणी त्वरित दुरुस्ती करावी.  याठिकाणी भीषण अपघात झाल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभाग जबाबदार राहील. याबाबत निवेदन  कोंढार चिंचोली चे माजी सरपंच देविदास साळुंखे यांनी करमाळा उपविभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना दिले आहे तसेच सोलापूर जिल्हाधिकारी,करमाळा तहसीलदार, सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना या निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या