भाजपला धोबीपछाड : महाविकास आघाडीचे जितेश अंतापुरकर विजयी


मुंबई

देगलूर बिलोली मतदारसंघाच्या  पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे  उमेदवार जितेश अंतापूरकर 1लाख 08 हजार 840 मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली. अंतापूरकर यांनी ४१  हजार ९३३ एवढ्या फरकाने विजय मिळविला आहे. देगलूर-बिलोली विधानसभेचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. यासाठी ३० ऑक्टोबरला मतदान पार पडले. मंगळवारी मतमोजणी झाली. मतदारांनी कौल महाविकास आघाडीला दिला आहे. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसने भाजपला धोबीपछाड करून सोडले.

देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत ३० ऑक्टोबरला ६४ टक्के मतदान झाले होते. यापूर्वी २०१९ च्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते.

या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलाला म्हणजेच जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली, तर भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली होती. सुभाष साबणे यांनी यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये रावसाहेब अंतापूरकर यांना तगडी टक्कर दिली होती. पण, साबणे हे त्यावेळी शिवसेनेत होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना रावसाहेब अंतापूरकर यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे ही पोटनिवणूक त्यांना लढायची होती. त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळाले नाही. कारण, महाविकास आघाडीने एकत्र ही निवडणूक लढविली. त्यामुळे सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून त्यांना तिकीट देखील मिळाले  होते  पण, साबणे यांना पुन्हा पराभव पत्करावा लागला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या