आ. पवार यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचे भूमिपूजन


तळेगाव ढमढेरे : 


 शिरूर -हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून तळेगाव  ढमढेरे (ता.शिरूर) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यांमध्ये पांढरीवस्ती येथील वेळनदीवरील बंधारा दुरुस्ती अठरा लक्ष, कुंभारआळी येथील भीमाशंकर मंडळ सभागृह दहा लक्ष,चाहुर वस्ती रोड दहा लक्ष, केवटेमळा येथील हनुमान मंदिर सभामंडप दहा लक्ष आदी विकासकामांचे भुमिपुजन करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून करोनाच्या महामारीमुळे विकासकामांना आळा बसला होता. राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असली तरी कोणतीही कामे रखडणार नाही.पुण्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मागण्या मान्य करत शिरूर -हवेली मतदार संघात भरपूर निधी दिल्याने तालुक्यातील दुरुस्तीची कामे व नवीन कामे  करण्यास चालना मिळाली आहे. असे जिल्हा परिषद सदस्या सुजाताभाभी पवार यांनी सांगितले.
यावेळी सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, सभापती मोनिका हरगुडे, माजी उपसभापती अनिल भुजबळ, बाळासाहेब भुजबळ,खरेदी विक्री संघाचे संचालिका सुजाता नरवडे ,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुदीप गुंदेचा,माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेशदादा भुजबळ, ग्रा.सदस्य मच्छिंद्र भुजबळ, गोविंद ढमढेरे, कीर्ती गायकवाड,मनोज आल्हाट, माजी उपसरपंच विजूपाटील ढमढेरे,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लांडे, भरत भुजबळ , सुनील ढमढेरे , संपत ढमढेरे , सुदर्शन  तोडकर ,प्रशांत गायकवाड संपर्क प्रमुख अमोल गायकवाड,किरण शिंदे ,अतुल शिर्के ,गणेश भुजबळ,संदीप भुजबळ,भाऊ मोडक,कालिदास भुजबळ,योगेश गायकवाड,एकनाथ भुजबळ, आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या