इंदुरीकर महाराजांना मोबाईलचा धसका


 ऐन कीर्तनात शूटिंग बंद करण्याच्या सूचना

आपल्या किर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स युट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी करुन नवा वाद निर्माण केला आहे.

बीड : माझ्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप यूट्यूबवर अपलोड करुन अनेकांनी कोट्यवधी पैसे कमवले, मात्र त्यांची अपत्ये दिव्यांग जन्माला येतील, असं वक्तव्य करत कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले होते. अकोल्यातील या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर इंदुरीकरांवर सर्व स्तरातून टिकेची झोड उठली आहे. त्यानंतर मंगळवारी बीड  जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील कासारी बोडखा गावात  महाराज यांचं कीर्तन होतं. या कीर्तन सोहळ्यात मात्र इंदुरीकरांनी मोबाईलवर शूटिंग करणाऱ्या व्यक्तींना मोबाईल बंद करण्यास भाग पाडले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. मोबाईल बंद करण्यासाठी इंदोरीकर महाराज दम देऊन बोलताना दिसत आहेत.


आपल्या किर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स युट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी करुन नवा वाद निर्माण केला आहे. अकोला शहरातील कौलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं किर्तन आयोजित केलं होतं. आपल्या जीवावर आतापर्यंत 4 हजारांवर लोकांनी युट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आणि याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणलं, अशी तक्रार इंदूरीकर महाराजांनी आपल्या किर्तनातून व्यक्त केली होती.

इंदुरीकर नेमकं काय म्हणाले?

चार हजार यूट्यूबवाले कोट्यधीश झाले माझ्या नावावर, नालायकांना पैसे मोजता येईना, आणि माझ्यावरच चढले, माझ्यावर पैसे कमावले, क्लिपा माझ्यावर तयार केल्या, यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरगं जन्माला येईल (हातवारे) हा विनोद नाही, जे सत्य आहे ते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या