शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेरला " भव्य रक्तदान शिबिर "

 


पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारताचे मा.केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसा निमित्त पारनेर येथे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम घेण्यात आले.

सोमवार दि.१२ डिसेंबरला सकाळी नारायण गव्हाण येथील जागृत देवस्थान असलेल्या चुंबळेश्वर महादेव मंदिरामधे देशाचे नेते शरद पवार यांच्या निरोगी आरोग्य व दिर्घायुष्यासाठी आमदार निलेश लंके यांनी अभिषेक केला.पारनेर शहरामधेही पारनेर नगरपंचायत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या माध्यमातून " भव्य रक्तदान शिबिराचे " आयोजन करण्यात आले होते.सदर रक्तदान शिबिराला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.देशासाठी व समाजासाठी अहोरात्र काम करणारे शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या रक्ताचा सर्वसामान्य व गरजू रुग्णांना लाभ होईल असा उद्देश हे रक्तदान शिबिर भरवण्यामागे असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगीतले,म्हणुनच या रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला.

आ. निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली भरवलेल्या या रक्तदान शिबिरामधे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर,पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  झालेल्या या कार्यक्रमासाठी, नगरपंचायतचे पाणीपुरवठा सभापती योगेश मते, आरोग्य सभापती डॉ . विद्या कावरे, आशोक चेडे , नितीन अडसुळ, बाळासाहेब नगरे श्रीकांत चौरे, भूषण शेलार, सुभाष शिंदे, डॉ. सचिन औटी, विजय भा.औटी, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय चेडे, शहर अध्यक्ष बंडू गायकवाड,उपाध्यक्ष रमीज राजे, युवक उपाध्यक्ष दगडू कावरे, सौ. दिपाली औटी, संदीप चौधरी , ऍड. मंगेश औटी, ऍड. गणेश कावरे, सचिन नगरे, दादा शेटे, अशोक कावरे, भगवान तांबे तसेच जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. वसंत झेंडे, डॉ. सोनाली खांडरे, डॉ. भुषण पवार, डॉ. श्याम पाटील आदींनी उपस्थिती दाखवत रक्तदाना सारख्या पवित्र कार्यामधे विशेष असे योगदान दिले आहे.

तसे पारनेर तालुक्यामधे आमदार निलेश लंके हे नेहमीच विविध उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या स्वरुपात रक्तदान शिबिरे आयोजित करत असतात.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर, विभागीय रक्त संक्रमण केंद्र यांच्या माध्यमातून भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरास अनेकांनी आपली उपस्थिती दर्शवत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या