धुक्यात हरवला पुणे नाशिक महामार्ग

घारगाव :  संगमनेर तालुक्यातील पठारभागात गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढला असून सर्वत्र सकाळी उशिरापर्यंत दाट धुक्याची दुलई पसरत आहे. याचा परिणाम येथून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. धुक्यामुळे वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. तर या अल्हाददायक वातावरणात प्रवाशी तसेच सकाळी फिरावयास येणारे नागरीक, सामान्य जनता मनसोक्त आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.

संगमनेरच्या पठारभागातून पुणे-नाशिक महत्वाचा महामार्ग जातो. सध्या मोठ्या प्रमाणावर पडत असलेल दाट धुके यामुळे या मार्गांवर अपघाताचा धोका वाढला आहे. यापूर्वी काही ठिकाणी धुक्यामुळे छोटे-मोठे अपघात सुद्धा झाले आहेत. सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे वाहन चालकांना रस्ता आणि समोरील वाहने नीट दिसत नसल्याने वाहन चालवितांना अडचणी येतात. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. परिणामी काही ठिकाणी वाहतुक कोंडी होत असल्याचे पहायला मिळते. सोमवारी सकाळी पुणे-अहमदनगर सीमेवरील आळेखिंड येथे वाहने लाईट लावूनच जात होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या