श्रीनाथ मस्कोबा यात्रेला प्रारंभ


               मानकरी, सालकरी दागिनदार व समस्त भाविकवर्ग यांच्या उपस्थितीत भक्तिमय  वातावरणात व जल्लोषात देवळातील धार्मिक विधी करण्यात आले.


सासवड :-

  शनिवार दिनांक ०४/०२/२०२२  रोजी पहाटे  ५.०० व पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर ६ वा. मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला व सकाळी देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १०.३० वा. देवाला दही- भाताची पूजा बांधण्यात आली. दुपारी १२ वा. धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मि. मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. 
  देवाचा लग्नसोहळानिमित्त मंदिरात फुलांची विविध प्रकारची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती.  क्षेत्र कोडीत ची काठी-पालखी घेऊन सर्व ग्रामस्थ मंडळी सायंकाळी ७ वा. श्री क्षेत्र वीर येथे आली. यावेळी देवाची धुपारती घेऊन मुकादम-पाटील, विश्वस्थ, मानकरी, दागीनदार, सालकरी मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानाने भेटाभेट होऊन वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. त्यानंतर काठी-पालखी तळावर स्थानापन्न झाली. रात्रौ. ११.३० वा. समस्त राऊत मंडळीच्या वतीने  देवाला पोशाख करून देव-देवतांना आव्हान करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीत उत्सवमूर्ती ठेऊन ढोल-ताश्याच्या गजरात तसेच कोडीत ची पालखी बाहेरून अंधारचिंच येथे गेल्या. त्यावेळी मानकं-यांना (शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवाण) फुलाच्या माळा घालण्यात आल्या. वाई व कण्हेरी पालख्यासह काठ्यांची भेटाभेट होऊन सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या. एक मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर श्री. चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ (मुकादम-पाटील) यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन रात्रो २.३० वा. लग्नाला सुरुवात झाली. ३ वा. लग्न सात मंगलाष्टके होऊन लग्नसोहळा संपन्न झाला. यावेळी पुरोहित दीपक थिटे, नंदकुमार थिटे, श्रीकांत थिटे यांनी पौराहित्य केले. सर्व काठ्या-पालख्या ग्राम प्रदक्षिणेसाठी गेल्या.   
सर्व मानकरी, सालकरी, दागीनदार  यांच्या उपस्थितीत मंदिरातील विधी करण्यात येत आहेत. यावेळी ट्रस्टचे चेअरमन श्री. संतोष धुमाळ ,व्हा. चेअरमन श्री. रवींद्र  धुमाळ, विश्वस्थ हनुमंत धुमाळ, अभिजित धुमाळ, अमोल धुमाळ,  नामदेव जाधव, दत्तात्रय समगीर, संजय कापरे  व सल्लागार इ. मंडळींनी ट्रस्ट तर्फे व्यवस्था पहिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या