नागरिकांच्या सतर्कतेमुळे नाशिक जिल्ह्यातून आलेले दोघे श्रीरामपुरात क्वारंटाईन 

0
  प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री  

श्रीरामपूर : प्रशासनाची परवानगी न घेता नाशिक जिल्ह्यातून श्रीरामपूर शहरात आलेल्या दोघांना नागरिकांच्या सतर्कतेमुळे १४ दिवसांसाठी  क्वारंटाईन   करण्यात आले.

श्रीरामपूर येथील वॉर्ड क्र ७ येथील  दिनेश स्कूटर परिसरात येवल्याहून गुपचूप आलेल्या दोन व्यक्तींना होम  क्वारंटाईन   करण्यात आले. वडाळा महादेव येथे इंडियन ऑइल पाईपलाईनच्या कामाला  जिल्हाधीकाऱ्यांनी  आज पासून परवानगी दिली. त्याचे कार्यालय श्रीरामपूर येथील दिनेश स्कूटर जवळ आहे. काल येवला व निफाड येथून दोन कर्मचारी अचानक विना परवानगी कार्यालयात मुक्कामी आले.
पत्रकार नरेश सिकची, सुमीत सचदेव, सुरज सोमाणी यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांना सदर प्रकार लक्षात आला. पत्रकार सिकची यांनी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहन शिंदे यांना संपर्क साधून त्वरीत कारवाईची  मागणी केली.  तालुका आरोग्य अधिकारी शिंदे, डॉ संकेत मुंदडा, डॉ सचिन पऱ्हे यांनी दोघांची वैद्यकीय चाचणी घेतल्या नंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दोघांना होम क्वारंटाईन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here