Corona: जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींची घोषवाक्यातून कोरोना विषयक जनजागृती

Rashtra Sahyadri Updates…
नेवासा: कोरोना विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू असल्याने या आपत्कालीन परिस्थितीत नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार  लर्निंग फ्रॉम होम ही संकल्पना राबवत जिल्हा परिषद प्रवरासंगम शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्यांनी परिसर अभ्यास या विषयातील “नकाशाशी मैत्री” या घटकांचा अभ्यास करत जग, देश, महाराष्ट्र राज्य व अहमदनगर जिल्हा यांच्या पुठ्यापासून नकाशा प्रतिकृतीचा प्रकल्प करून यामध्ये कोरोनाला हद्दपार करण्यासाठी विविध घोषवाक्यातून जनजागृती करण्यात आली.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत प्रवरासंगम शाळेतील उपक्रमशील शिक्षिका शितल झरेकर यांनी घरी असलेल्या विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास या विषयातील “नकाशाशी मैत्री” या घटकावर आधारित प्रकल्प करण्यासाठी व्हाट्स अप ग्रुप व फोनवर मार्गदर्शन केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाच्या केशरी, पांढरा, हिरवा रंगातील पारंपरिक वेशभूषा करून हातात जग, भारत देश, महाराष्ट्र राज्य व अहमदनगर जिल्हा याचा नकाशा रेखाटलेली प्रतिकृती व त्यावर मध्यभागी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जनजागृती आधारित घोषवाक्य द्वारे संदेश दिला.

जगासह भारत देशावर ओढवलेल्या कोरोना विषाणू संकटाबद्दल आपल्या मायभूमी चे रक्षणासाठी वैद्यकीय कर्मचारी,पोलीस,सफाई कामगार,प्रशासकीय यंत्रणा,सरकार देत असलेल्या योगदानास सहकार्य करीत प्रवरासंगम शाळेचे विद्यार्थी सरसावले आहेत.

घरी रहा, सुरक्षित रहा आणि शासनाचे नियम पाळा अशा विविध घोषवाक्य नकाशाच्या मध्यभागी लिहून जनजागृती पर आधारित प्रकल्प बाहेर न जाता घरातील उपलब्ध साहित्याचा वापर करून पूर्ण केला आहे.

दररोज व्हाट्स अँप द्वारे मिळणारा अभ्यास पूर्ण करत सुट्टीच्या फावल्या वेळेत या जनजागृती प्रकल्पाद्वारे नवनिर्मिती चा आनंद व सखोल विषयज्ञान विद्यार्थ्यांना मिळाल्याचे शिक्षिका झरेकर यांनी सांगितले.या मध्ये स्वानंदी ठाणगे, आदिती आगळे, प्रज्ञा पांडव, दिव्या शेलार, साई डावखर, चैतन्य कोरडे, कार्तिक आगळे, फरहान पिंजारी, प्रिया सुडके, गौरी पांडव, श्रावणी मते, जान्हवी शेलार या १२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कोरोना विषयक घोषवाक्य लिहून जनजागृती केली.

5 COMMENTS

Leave a Reply to Idfhpm Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here