Shrirampur : माळवाडगांव येथे कोरोना विलगीकरण कक्ष सुरु

पुण्यातून आलेले दाम्पत्य माळवाडगांवात विलगीकरण कक्षात क्वारंटाईन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

माळवाडगांव – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना विलगीकरण कक्षात करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सरपंच, ग्रामसेविका, तलाठी व पोलीस पाटील यांची कोरोना ग्रामसमिती स्थापन करण्यात आली असून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथे आज (दि.२) रोजी पुण्यातील एक दाम्पत्य गावात आल्याची माहिती कोरोना ग्राम समितीला समजल्यानंतर त्यांनी तात्काळ सदर कुटुंबाची भेट घेऊन त्यांना शाळेतील विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना संक्रमणापासून दूर ठेवण्यासाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्या आदेशानुसार गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कोरोना विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे.
बाहेरुन गावात वास्तव्यास येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना स्वत:च्या कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने गावातील कोरोना विलगीकरण कक्षात १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी देखील दक्ष राहून बाहेरुन गावात आलेल्या व्यक्तीची माहिती ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा पोलीस पाटील यांना द्यावी, असे आवाहन सरपंच बाबासाहेब चिडे यांनी केले आहे.
माळवाडगांव परिसरात एकही कोरोना संशयित रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही परंतु दक्ष राहून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनाला मदत करावी.
– डॉ.सोहेल शेख वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र माळवाडगांव
लाॅकडाऊनच्या काळात प्रत्येकाने घरातच रहा. स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्या. प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करा. तसेच बाहेरुन गावात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
 – संजय आदिक, पोलीस पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here