Kada : घराघरात जंतुनाशक सोडिअम हैपोक्लोराईड वाटप

2

ग्रामपंचायत कर्मचारी, आशा स्वयंसेविकांची मेहनत फळाला

कोरोना विषाणूच्या आपत्तीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक कुटूंब निरोगी राहावे. यासाठी ग्रामपंचायत कर्मचा-यांसह आशा स्वयंसेविकांचं योगदान महत्वपूर्ण ठरतेय. उन्हातान्हात घराघरात जंतुनाशक सोडिअम हैपोक्लोराईड वाटप करून कर्मचारी घेत असलेली मेहनत फळाला येऊ लागली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता पोलिस, आरोग्य, महसूल, शिक्षण आदी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी कोरोनाचा सामना करण्यासाठी ताकदीनिशी मैदानात उतरलेत. त्यांच्या खांद्याला-खांदा लावून ग्रा.प. कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविकांचं योगदान देखील सद्यस्थितीत महत्वाचं ठरताना दिसत आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून कड्यातील प्रत्येक कुटूंब निरोगी अन् सुरक्षित राहावे, यासाठी हे कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून फिल्डवर कार्य करीत आहेत.
महामारी कोरोना विषाणूबाबत त्यांच्याकडून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यामार्फत प्रत्येक घरात जाऊन सोडिअम हैपोक्लोराईड या जंतुनाशक औषधाचे वाटप करण्यात येते. तुटपुंजा वेतनावर काम करणारे हे कर्मचारी दिवसभर उन्हातान्हात परिश्रम घेत आहेत. मधुकर कर्डीले, सर्जेराव करांडे, दादुमामा कदम, गंगाराम इरेवाड, संतोष जगताप, साबळे, सचिन कर्डीले आदी ग्रा.प. कर्मचा-यासह गटप्रवर्तक सुषमा गायकवाड, आशा स्वयंसेविका रिजवाना पटेल, सुप्रिया कर्डीले, संगिता खंदारे, निता कदम, अनिता विधाते, मनिषा राऊत, रोहिणी वावधाणे, अनिता वाघ इत्यादी कर्मचारी घराघरात जाऊन कोरोनाचा सामना करताना दिसत आहेत.

2 COMMENTS

  1. मी अकोल्यावरून अजय जागीरदार बातमीदार मी बातमी देऊ शकतो का सुद्धा आहे फ्रीलान्स फोटोग्रफर सुद्धा आहे

    • कृपया या संदर्भात राष्ट्र सह्याद्रीचे मुख्य संपादक करण नवले यांच्याशी संपर्क साधा 7774001818

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here