Rahuri : ब्राह्मणी शाळेत विध्वंसक वृत्तीच्या लोकांचा धुडगूस, साहित्याची तोडफोड; गुन्हा दाखल

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी- तालुक्यातील पटसंख्येने सर्वाधिक मोठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुट्टीच्या कालावधीत रात्रीच्या वेळी वर्गातील व परिसरातील साहित्याची विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांकडून तोडफोड सुरू आहे. जिल्ह्यात शाळेची शैक्षणिक गुणवत्ता टिकवून आहे.

सर्वाधिक मोठा परिसर असलेल्या शाळेत गत वर्षी बदलून आलेल्या शिक्षकांनी परिश्रम घेत वर्ग डिजिल केले. विविध शोभेची झाडे लावली. पाण्यासाठी पाईपलाईन केली. मात्र, काही विध्वंसक वृत्तीच्या लोकांकडून विद्येच्या पवित्र मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळेत धुडगूस घातला जात आहे. यापूर्वी रात्रीच्या वेळी नको त्या गोष्टी शाळेच्या परिसरात सुरू आहे.

याबाबत शिक्षकांनी वारंवार शिक्षण समिती व जागृत पालकांकडे तक्रार केली.मात्र,अद्याप गैरप्रकार थांबला नाही. अखेर मुख्याध्यापक रामदास कोरडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष काकासाहेब राजदेव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारीचा पाढाच वाचला. आज अखेर झालेल्या नुकसानीचे फोटो दाखविण्यात आले.

मुख्याध्यापक रामदास विष्णू कोरडे यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, वर्गातील साहित्याची उचका पाचक केली.पाईपलाईनवर दगड टाकून फोडण्यात आली. विविध प्रकारची लावलेली झाडे उपटून फेकून देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गावातील चिमुकल्याचे भविष्य घडविणाऱ्या विद्येच्या मंदिरात खंडेराया या वाईट घटनेचा ग्रामस्थांमधून निषेध व्यक्त होत आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here