Beed : माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्यातर्फे पोलीस, अधिकारी व कर्मचा-यांची आरोग्य तपासणी

3
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड – माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या आदेशावरून व जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी सुरू करुन आज २४ व्या दिवशी बीड पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार व पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत साहेब यांच्या म्हणण्यानुसार आज सायंकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत पिंपळनेर ता. जि. बीड पोलिस स्टेशनमध्ये सर्व आधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
“कोरोना माहामारी”आपत्कालीन परीस्थितीमध्ये देशाचे पोलीस योद्धे कठीण प्रसंगी जनतेसाठी सेवा देताना अनेक आजारांना बळी पडतात. त्यामुळे “मदत नव्हे आपले कर्तव्य” समजून आपल्या पोलिस बाधवांना आमच्याकडून “कर्तव्य” समजून आरोग्य सेवा देत आहोत.
यावेळी पोलीस निरीक्षक भुतेकर यांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली यावेळी ५० कर्मचारी यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर काहींना रक्तदाब व साखरेचा कमी -जास्त आजार दिसून आल्यानंतर त्यांना पुढील औषधोपचार करण्यासाठी संबंधित तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी आरोग्य तपासणीसाठी भगिरथ बीयाणी, डॉ. लक्ष्मण जाधव, विलास बामणे, दत्ता परळकर, राजेश चरखा, सुरेश पवार आदी उपस्थित होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here