Rahuri : कारागृहात जेवण पुरवणा-या ठेकेदाराकडून कैद्यांना मिरची पूड पुरवण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी | राजेंद्र उंडे | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी – कारागृहात कैद्यांना जेवण पुरविणाऱ्या ठेकेदाराच्या इसमाने न्यायालयीन कोठडीतील चार आरोपींना जेवणाबरोबर मिरचीची भुकटी, फरसाण व वेफर्सचे पुडे देण्याचा प्रयत्न केला. त्यास, गार्ड अंमलदार व पहारेकरी यांनी मज्जाव केला. त्यामुळे, चार आरोपींनी दुपारी साडेबारा वाजता मोठमोठ्याने आरडाओरड करून, कोठडीच्या गजाला धडका घेऊ. आम्ही काहीही करू, अशी धमकी दिली.

घटनेची समजलेली माहिती अशी, आज दुपारी कैद्यांना जेवण पुरविणाऱ्या ठेकेदाराचा इसम सद्दाम शहा तीन व चार नंबरच्या कोठडीतील कैद्यांना जेवण देत होता. गार्ड अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल रामनाथ भाबड व पहारेकरी यांना त्याच्याकडे तिखट मिरचीच्या भुकटीची पूडी, फरसान, वेफर्स पुडे आढळले. चार नंबर कोठडीत असलेल्या न्यायालयीन कोठडीतील आरोपी आजीम पठाण, महेश निमसे, सागर मांजरे व आसिफ पठाण यांनी मागणी केल्याचे शहा यांनी सांगितले. तिखट व बाहेरचे खाद्यपदार्थ दिल्यामुळे आरोपी आजारी पडतात. त्यामुळे, गार्ड अंमलदार यांनी मज्जाव केला. त्यामुळे, चारही आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केला. तुंम्ही पैसे घेतल्यावर देऊ देता काय? तुम्हाला पैसे पाहिजेत काय? असे ओरडू लागले. कोठडीच्या गजाला धडका घेऊ. आंम्ही काहीही करू.” अशी धमकी आरोपींनी दिली.

दरम्यान, न्यायालयात नेलेल्या एका कैद्याला चार नंबरच्या कोठडीत ठेवताना, या चार आरोपींनी विरोध केला. पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवू नका. असे म्हणून, त्या कैद्याला गचांडी धरून, बाहेर ढकलले. त्या कैद्याला तीन कोठडीत ठेवावे लागले. याप्रकरणी घटनेचा अहवाल गार्ड अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल रामनाथ दादाबा भाबड यांनी राहुरी पोलीस निरीक्षक यांना दिला. त्याची प्रत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तालुका दंडाधिकारी व पोलीस उप अधीक्षक, श्रीरामपूर यांना पाठविली. तशी नोंद स्टेशन डायरीला केली आहे.

राहुरी कारागृहात चार कोठड्या आहेत. पैकी एक कोठडी महिला कैद्यांसाठी आहे. एका कोठडीत सहा कैदी ठेवण्याची क्षमता आहे. सध्या राहुरी कारागृहात ५७ कैदी आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने, न्यायालयीन व पोलीस कोठडी मिळालेल्या कैद्यांना एकत्र ठेवावे लागते. परंतु, न्यायालयीन कोठडीतील आरोपींनी पोलीस कोठडीच्या कैद्याला गचांडून बाहेर काढल्याने, कैद्यांमध्ये वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कारागृहात जेवण पुरविणाऱ्या ठेकेदाराची नियुक्ती ई-टेंडर द्वारे कारागृह महानिरीक्षक यांच्याकडून केली जाते. जेवण अळणी असल्यास काही कैदी तिखट मागतात. मिरची पूड सुटी होती. की, बंद पॅकेट होते. मिरची पूड पुरविणे योग्य की अयोग्य? याबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस काढून खुलासा मागविला जाईल.  
– फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी

4 COMMENTS

  1. I?¦ve read several excellent stuff here. Definitely worth bookmarking for revisiting. I wonder how much attempt you place to make the sort of fantastic informative site.

  2. I was very pleased to find this web-site.I wanted to thanks for your time for this wonderful read!! I definitely enjoying every little bit of it and I have you bookmarked to check out new stuff you blog post.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here