तिन्ही झोन मध्ये दारू विक्रीला परवानगी तसेच, सलूनही उघडणार

0

मद्य प्रेमींसाठी आनंदाची बातमी काही शर्तीवर तीनही झोन’मध्ये दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. लॉक डाऊन च्या काळामध्ये सर्वांसाठी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात या हेतूने सोशल डिस्टन्ससिंग पाळत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने उघडी ठेवण्यात आली होती. पण दारूची दुकाने ही इतर दुकाना प्रमाणे बंद होती. पण आता सरकारने मद्य विक्रीला परवानगी देत सोशल डिस्टन्स पाळत विक्रीला परवानगी दिली आहे. यामुळे मद्य प्रेमी मध्ये चांगलाच आनंद पाहायला मिळत आहे.

गृह मंत्रालयाने शुक्रवारी लॉक डाऊन १७ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली त्यावेळी हिरव्या आणि नारंगी क्षेत्रातील अनेक निर्बंध उठवले होते. ४ मेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात हिरव्या नारिंगी व लाल क्षेत्रांमध्ये सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच तिन्ही क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.

हिरव्या, नारिंगी व लाल या तिन्ही क्षेत्रांमध्ये, बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका दुकानावर एकावेळी पाच व्यक्ती उभे राहतील आणि गर्दी होणार नाही अशा शर्तींवर दुकानांना मद्य विक्री करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. लॉक डाउन कालावधी वाढविण्यात आले आहे त्याचबरोबर काल सरकारने ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये मद्य विक्रीला परवानगी दिली होती. तर आज सरकारने रेड झोन मध्ये सुद्धा दारू विक्रीला परवानगी दिलेली आहे. परंतु कन्टोनमेंट झोन मध्ये अजूनही दारू विक्री केली जाणार नाही असे आदेश सरकारने दिले आहेत. लॉक डाऊनच्या काळामध्ये अनेक राज्यांनी केंद्राकडे मद्य विक्री दुकानाला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. यानुषंगाने मध्य विक्रीवर परवानगी देण्यात आली असावी. तसेच मध्य विक्रीतून सरकार कडे बराच कर जमा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here