प्रतिनिधी | वजीर शेख | राष्ट्र सह्याद्री
पाथर्डी – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या संदर्भात पाथर्डी तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने गाव तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गावचे सरपंच बाजीराव पाटील गर्जे, उपसरपंच दिलीप अन्ना कचरे, माननीय शेषराव आण्णा कचरे, व ग्रामसेविका कंठाळी या सर्वांनी गावातील सर्व दुकानदारांना ग्रामपंचायतीमध्ये बोलावून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले तसेच विनाकारण गर्दी करू नये, असे सांगितले.

तालुक्यातील मोहोज देवढे येथे कोरोना रुग्ण सापडल्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याची खबरदारी म्हणून हा ग्रामपंचायतीच्या वतीने निर्णय घेण्यात आला. तसेच भाजीपाला व फळ विक्रेत्यांनाही सांगण्यात आले की कोणीही माल विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यावेळी सर्व व्यवसायिक दुकानदार उपस्थित होते. सर्व व्यावसायिकांनी आम्ही आपल्या सूचनेचे पालन करू, असे सांगितले.
यावेळी गावचे सरपंच बाजीराव पाटील गर्जे, उपसरपंच दिलीप अन्ना कचरे, शेषराव अण्णा कचरे, ग्रामसेविका कंठाळे मॅडम, ग्रामपंचायत शिपाई राजेंद्र साळुंके, पाणीपुरवठा कर्मचारी बाबासाहेब सांगळे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या निर्णयाला युवक वर्गाने प्रतिसाद दिला.