Shrigonda : तलाठी ग्रामसेवक फक्त नावाला सरपंच आले गावच्या कामाला

0

प्रतिनिधी | दादा सोनवणे | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून लॉक डाउन घेण्यात आला असून या कामात बहुतांश गावातील तलाठी ग्रामसेवक कायम गैरहजर राहत असून या ठिकाणी गावातील सर्व करा कामे सरपंचांना करावी लागत आहेत. त्यामुळे तलाठी ग्रामसेवक फक्त नावाला आणि सरपंच आले गावच्या कामाला अशी नवीन मन प्रचलित झाली असून याबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन योग्य ती पावले उचलावी, अशी मागणी जनमानसातून होताना दिसत आहे.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाव्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून संचारबंदीसह जमावबंदीचे आदेश पारित करण्यात आले असून ग्रामसेवक आणि तलाठी कायम गैरहजर राहत आहेत. त्यामुळे गावात कोण नवीन आले आणि कोण बाहेर गेले याचा लेखाजोखा ग्रामपंचायतीतील सरपंचांना ठेवावा लागत आहे. तसेच कोरोनाबाबत नवीन काही प्रशासनाकडून सूचना आल्यास त्याचीही अंमलबजावणी सरपंच महोदयांना करावी लागत असल्यामुळे एकंदरीत सर्व ताण हा ग्रामसेवक यांच्या गैरहजेरीत सरपंच यांच्यावर येत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना गुमान ही कामे करावी लागत आहेत त्यात गोरगरीबांना राशन वाटप तसेच सॅनिटाइयर मास्क आदींचे वाटप करताना सुद्धा काही गावातील सरपंच दिसत आहेत.
तसेच संचारबंदी असल्यामुळे गावात विनाकारण फिरणाऱ्या लोकांवरही त्यांना लक्ष ठेवावे लागत आहे. त्याचबरोबर इतर प्रशासकीय कामाचा ही ताण सरपंच यांच्यावर आला असून सरकारी अधिकारी म्हणजे ग्रामसेवक आणि तलाठी हे बिनदास्त धोरणाच्या नावाखाली घरी सुट्ट्या मौजमजा करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सरपंच हे अहोरात्र जनतेच्या हितासाठी झगडताना दिसत आहेत. त्यात बाहेरून आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन करणे तसेच त्यांचेवर लक्ष ठेवणे आदी कामे सरपंच यांना करावी लागत आहे.
त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावात तलाठी ग्रामसेवक फक्त नावाला राहिले असून गावच्या कामासाठी आता फक्त सरपंच सर्वसामान्य नागरिकांना दिसू लागले आहेत. त्यामुळे तलाठी ग्रामसेवक फक्त नावाला आणि सरपंच चोरले गावाला, अशी प्रतिक्रिया जनसामान्यात ऊन उमटताना दिसत आहेत. मात्र, याबाबत अजूनही प्रशासन गाफील असल्यामुळे सरपंचावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. याची प्रशासनाने नोंद घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here