Shevgaon : मुळा पाटपाण्यासाठी शेतक-यांचा आत्मदहनाचा पवित्रा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
ढोरजळगांव – शेवगांव तालुक्यातील जोहरापूर भातकुडगाव खामगाव येथील मुळा पाटबंधारे खात्याच्या कर्मचा-यांच्या  मनमानी कारभारामुळे लाभार्थी गावातील शेतक-यांना पाटपाणी मिळत नाहीए. याच्या निषेधार्थ शेतकरी व शेवगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संदीप बामदळे यांनी त्वरीत पाणी न सोडल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील निवेदन कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मुळा उजव्या कालव्याचे रोटेशन सुरू होऊन आज ४२ दिवस झालेले आहेत टेल टू हेड या पद्धतीने पाणी देण्याची गरज होती. परंतु आजपर्यंत कोणत्याही भागाला शेतीसाठी पाणी मिळालेले नाही. सध्या सर्वत्र कोरोना आजारामुळे कलम १४४ लागू असल्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याला आम्हाला सामुदायिक रित्या भेटता आले नाही. परंतु शाखाधिकारीपासून माननीय कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर यांच्या बरोबर प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व फोनवर प्रत्येक दिवशी संपर्क करण्यात आलेला आहे. तरी पण आजपर्यंत या भागाला पाणी मिळाले नाही, अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी 2005 चा पाणी वाटप कायद्याची खिल्ली उडवली आहे.
या भागातील पिकाच्या अवस्था पाहता परिसरातील सर्व पिकाचे ८० टक्के नुकसान झालेली आहे. याला सर्वस्वी पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी जबाबदार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे. या मागणीसाठी सामूहिकरित्या सर्व शेतकरी आत्मदहन करणार आहोत याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी व आम्हाला येत्या दोन दिवसात पाणी देण्याची व्यवस्था करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. त्वरीत पाणी सोडण्याची भूमिका न घेतल्यास प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व शेवगाव तालुका अध्यक्ष संदीप बामदळे भातकुडगावचे एकनाथ घुमरे जोरापूरचे माजी सरपंच अशोकराव देवढे प्रगतशील शेतकरी अशोकराव पंडित आदींनी आत्मदहनाचा ईशारा दिला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here