Rahuri : होम क्वारंटाईन न होण्यासाठी, मुंबईच्या जावईने तालुका प्रशासनास वेड्यात काढले !

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी – मुंबईच्या ‘हॉटस्फॉट’ भागातून देवळाली प्रवरात आलेल्या जावयास ‘होम क्वारंटाईन’ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय पथक गेले असता मी फार मोठा संपादक असल्याचे सांगून मी सर्व तपासण्या करुनच मुंबईतून बाहेर पडलो आहे. अशा फसव्या बढाया मारुन राहुरी तालूक्यातील प्रशासनास वेड्यात काढले.

याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांना देवळाली प्रवरा जुना गणेगाव रस्ता भागात मुंबई येथील हॉटस्पॉट भागातून एक जण तर त्याची पत्नी पुणे येथील हॉटस्पॉट भागातून आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्या व्यक्तीचा शोध घेतला असता ती व्यक्ती देवळाली प्रवरा येथील एका कुटुंबाचा जावई आहे. त्या कुटुंबातील सर्व व्यक्ती मयत झाल्याने स्थावर इस्टेट मुंबईच्या जावयास मिळाली आहे. त्या जावयाने शेती बटाईने देऊन दोन तीन वर्षातून एकदा येत असल्याचे स्थानिकांनी माहिती दिली.

कोरोना संसर्गजन्य आजाराची लागण सुरु  झाल्यानंतर गेल्या चार दिवसापूर्वी मुंबईचा जावई देवळाली प्रवरात दाखल झाला. येथे आल्यावर त्याने आपली पत्नी पुणे येथे राहत असल्याने तीला देवळाली प्रवरा येथे बोलावून घेतले. त्याची पत्नी पुणे येथील हॉटस्पॉट भागातून आल्याचे त्यांच्याकडून मिळालेल्या मुंबई व पुणे येथील पत्त्यावरून डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी तेथे संपर्क साधला असता हा भाग हॉटस्पॉट असल्याचे तेथील सुञांनी सांगितले. त्यानुसार डॉ. मासाळ व त्यांचे पथक या पती पत्नीस होम क्वारंटाईन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले.

या महाशयाने जावयाची जात दाखवली तसे वैद्यकिय पथकाला मी होम क्वारंटाईन होणार नाही. मी येताना साऱ्या तपासण्या करुन आलो. तर माझी पत्नी पुण्यातून तपासण्या करुन आली आहे. मला तुम्ही होम क्वारंटाईन करु शकत नाही. असे मुंबईच्या जावयाने वैद्यकिय पथकाला सांगितले. वैद्यकीय तपासणीचे रिपोर्ट मागितले असता मी तुम्हाला रिपोर्ट दाखवू शकत नाही, असे वैद्यकिय पथकाला सांगितले.

वैद्यकिय पथकाचे डॉ. मासाळ यांनी तहसिलदार एफ. आर. शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, मंडलधिकारी कानडे यांच्यांशी संपर्क करुन माहिती दिली. या अधिकाऱ्यांनी भ्रमणभाषवरच त्या मुंबईच्या जावयाशी बोलणे करुन  होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. परंतू या जावयाने अधिकाऱ्यांना मी मोठा संपादक आहे. मी येताना सर्व तपासण्या करुन आलो आहे. तुम्ही मला होम क्वारंटाईन करु शकत नाही. असे बोलबच्चन करुन अधिकाऱ्यांना वेड्यात काढले? या भागातील रहिवाशी यांनी या मुंबई व पुण्याच्या पती पत्नीला घेऊन जा. हा संसर्गजन्य आम्हाला होईल अशी भीती व्यक्त करीत आहे.

“बाहेरुन येणाऱ्या सर्व जणांना होम क्वारंटाईन केले आहे. आजपर्यंत जिल्हा बाहेरुन आलेले  543,  राज्या बाहेरुन आलेले 3, देश बाहेरुन आलेले 5, असे एकूण 551 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 2 व्यक्तींना नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. मोठी लोक होम क्वारंटाईन होत नाही उलट प्रशासनास वेड्यात काढत आहे. कोरोनोच्या कुठेही खाजगी तपासणी केली जात नाही. सरकारी तपासणी केली तरी आरोग्य तपासणीचा अहवाल रुग्णास दिला जात नाही. त्यामुळे या मुंबई व पुण्याच्या पती पत्नीने तपासण्या कुठे केल्या असा प्रश्न निर्माण होत आहे. महसूल व पोलीस त्यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवतात. असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोठ्या लोकांना एक निर्णय सर्वसामान्यांना एक निर्णय  होत असेल तर या पुढे कोणालाही होम क्वारंटाईन करण्यात येणार नाही. असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आण्णासाहेब मासाळ यांनी सांगितले.

“देवळाली प्रवरा येथे मुंबई व पुणे येथून पती पत्नी शहरात आले आहेत. वैद्यकिय पथक त्यांच्या घरी जाऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यासाठी गेले परंतू त्या कुटुंबाने नकार दिला. त्यांच्याशी संपर्क साधला पत्नीच्या वैद्यकिय तपासणीसाठी आलो .आम्ही लगेच जाणार आहोत पण ते गेल्याचे दिसत नाही. त्यामुळे देवळाली प्रवराच्या नागरिकांच्या सुरक्षितता राहण्यासाठी त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येईल, असे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here