नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसुलीसाठी पथके तयार

2

राष्ट्र सह्याद्री प्रतिनिधी

संगमनेर : सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकणे, मास्क न वापरणे, सुरक्षित वावर न ठेवणे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर संगमनेर नगरपालिकेच्या पथकांनी कारवाया सुरू केल्या आहेत. या कारवाईत पथकांनी आतापर्यंत १ लाख ७ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.करोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यांवर थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी न करता सुरक्षित वावर ठेवणे अपेक्षित आहे. याशिवाय घराबाहेर पडताना तोंडाला मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे; मात्र, संगमनेरमध्ये नागरिकांकडून या बंधनांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. त्यामुळे नागरिकांना या नियमांबाबत शिस्त लागण्यासाठी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य व अन्य विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली तीन पथके तयार करण्यात आली आहेत. सुदाम सातपुते, अनिल काळण, राजेंद्र सुरग, विजय अनाप, सतीश बुरंगुले, दत्तात्रय ताजणे, पोपट सोनवणे, गौरव मंत्री, बाळासाहेब साळवे, भीमाशंकर वर्पे, राजेंद्र बडदे, अलताफ शेख, दत्तात्रय गवांदे, सुरेश सातपुते, चंद्रकांत ढोले, जयराम मंडलिक, अजय जेधे, विजय अभंग आदींचा या पथकांमध्ये समावेश आहे.

शहराच्या विविध भागांत फिरून या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांची माहिती देऊन नियम मोडणाऱ्यांकडून १ लाख ७ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून १५० रुपये, मास्क न लावणाऱ्यांकडून ५०० रुपये, सुरक्षित वावर न ठेवता व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून प्रत्येकी २ हजार व नागरिकांकडून ५०० रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात

येत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here