कर्जवसुलीला तीन महिने मुदतवाढ द्यावी; परिवर्तन मंडळाचे उपनिबंधकांना निवेदन

1

राष्ट्र सह्याद्री प्रतिनिधी

नगर :. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षक सोसायटीने रिजर्व बँकेच्या निर्देशांनुसार कर्जवसुली साठी तीन महिने मुदतवाढ द्यावी,’ अशी मागणी परिवर्तन मंडळाने केली आहे. याबाबत माध्यमिक शिक्षक सोसायटी आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाउन आहे. या काळात नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. जानेवारीपासून शिक्षकांच्या पगारातून आयकर भरणा केला जात आहे. त्यामुळे आता शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

रिजर्व बँकेने सर्व प्रकारच्या कर्ज वसुलीस स्थगिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार राज्यातील शिक्षक सोसायट्यांनी अंमलबजावणी केली आहे. मात्र, नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीने अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. सोसायटीच्या अनेक सभासदांनी कर्जवसुली आणि व्याज हप्त्यास स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

ज्या सभासदांना त्यांच्या हप्त्यांना स्थगिती मिळावी असे वाटते, अशा सभासदांकडून लेखी घेऊन त्यांचे कर्जाचे हप्ते तीन महिन्यांसाठी थांबवावेत अशी मागणी सोसायटीचे संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर आदींनी केली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here