Shrigonda : भिमानदीत जून अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा

0

पाचपुते यांच्या प्रयत्नानेच भीमा नदीपात्रात पाणीसाठा

पेडगावचे माजी सरपंच रोहिदास पवार यांची काही शेतक-यांसह पाहणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – भिमानदीचा पाञात भर उन्हाळ्यात शेतीसाठी पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे नदीकाठच्या सर्व शेतक-यांना कोरानांचे संकट असताना ही पाण्यामुळे त्यांचा चेहरावर वेगळच प्रकारचे समाधान दिसत आहे. परंतु काही दिवसापूर्वी काही वृत्तामध्ये भीमा नदीचे पाणी काही दिवसात संपेल, यामुळे शेतकरांचे पिकांचे, फल-बागांचे मोठे नुकसान होईल अशा चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. परंतु आज प्रत्यक्षात पेडगावचे माजी सरपंच रोहिदास पवार यांनी काही शेतक-यासह स्वत: पाहणी करुन त्यांनी सांगितले की या सर्व बातम्या खोट्या असून हे खोडसाळ पणाचे वृत आहे, माजी मंञी बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नाने जून अखेर पुरेल एवढा पाणीसाठा भीमा नदीपाञात आहे. 

यावेळी उत्तमराव आधोरे, सुरेश क्षीरसागर, नानासाहेब शितोळे, विशाल कवडे, रोहित गायकवाड, जंजीरे सर, माणिक झिटे,इरफान फिरजादे,बस्सीरभाई काझी,दिलीप काराळे,सुनिल खेडकर,भगवान कणसे,बाळु नवले,शकुर शेख,विठ्ठल वाळुंज,गणेश मैंद,संजय आगिले,अंबादास नेटके,दत्ताञय अनुभुले,कुडलिंक रसाळ हे शेतकरी उपस्थित होते.

कोराना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वञ लाॅकडाउन असल्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्टा संकटात सापडला असला, तरी पण नदीपाञात भरपूर पाणी साठा असल्याने जूनपर्यंत शेतील पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. आज पेडगाव येथील जवळपासच्या पाच ते सहा गावातील शेतकरांनी भिमा नदीवर प्रत्यक्षात जाऊन नदीपाञाची पाहणी करत या खोडसाळ पणाच्या बातम्याचा निषेध केला. पाचपुते यांनी जलसंपदामंञी व भिमा पाटबंधार्याचे आधिकारी यांच्याशी सतत  काॅन्फरन्स घेत व सतत पाठपुरावे करत नदी पाञातील सर्व बंधारे भरुन घेतले. एवढेच नाहीतर पाचपुते यांच्या आदेशाने भिमा पाटबंधा-याचे अधिकारी साळवे साहेब यांनी स्वतः बंधारावरती जाऊन पाण्याची पाहणी केली.
यामुळे पेडगाव,अजनुज, शेडगाव, आनंदवाडी, वेळु, चिखलठणवाडी, कणसेवाडी, टाकळी,चोराचीवाडी,आधोरीवाडी या गावातील शेतक-यांनी पाचपुते यांचा सर्व गावांच्या वतीने पेडगाव येथील दत्तमंदिर येथे सत्कार करणाच्या कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु कोरोना वायरस व लाॅकडाउनमुळे त्यांनी सत्कार न स्वीकारता सर्व लोकांना घरीच राहून काळजी घेण्याचे आवाहन केले. यामुळे सर्व शेतक-यांनी त्यांच्या शब्दाला मान देत घरी राहून आप-आपल्या गावाच्या वतीने त्यांचे विविध माध्यामातून (फोन,फेसबुक,व्हाटसअॅप) आभार मानले. यावेळी पाचपुते यांनी भिमा नदीला कधी पाणी कमी पडून देणार नाही, असे सांगत शेतक-यांना दिलासा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here