Aurangabad: प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांसह नागरिकांच्या बेशिस्तीचा फटका; कोरोनाबाधितांची संख्या 349 वर

Rashtra Sahyadri Updates

औरंगाबाद : प्रारंभी कोरोनामुक्त असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 359 वर पोहचली आहे. प्रशासनाने सम-विषम तारखेच्या योजनेतून दिलेल्या सवलतींचा काही नागरिक गैरफायदा घेत असून रस्त्यांवर गर्दी केली जात आहे.


रेड झोन मध्ये असलेल्या औरंगाबाद शहरात संचारबंदी दरम्यान दिलेल्या थोड्या सवलतींमुळे दिड महिन्या पासुन कडक पणे राबविलेल्या सामाजिक अंतराचा उद्देश सफल होणार नाही, असे दिसून येत आहे. यात सुधारणा न झाल्यास पोलीस, वैद्यकीय यंत्रणा, महानगरपालिका कर्मचारी आणि राज्यशासन कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान करुन घेतलेल्या अथक परिश्रमावर पाणी फेरल्या सारखे होईल . सद्यस्थितीत कोणत्याही प्रकार ची सवलत न देता 17 तारखे पर्यंत शाशनाने वाढवलेल्या लाँक डाऊन ला पोलिसांनी सक्ति ने राबवावे, असे मत समाजातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे. लॉक डाउन काळात कायद्याचे पालन करण्यात अपयशव्येत असेल तर सामान्य जनतेलाही मोकळीक देऊन नियम व कर्फ्यू शिथिल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बहुतांश समाज शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करत आहे. परंतू त्यांच्या अतिशय महत्वाच्या गरजांसाठी वाहनातुन बाहेर पडणा-यांवर पोलिस कार्रवाई करुन त्यांना दंड ठोकत आहेत. दुसरीकडे काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या हलगर्जीपणाचे दंड सामान्य औरंगाबादकरांना सोसावा लागत आहे, नियमांच्या पडद्याआड काही गरजमंद आणि ख-या व्यक्तिंना पोलिसांनी दंड अथवा शिक्षा करू नये, अशी भावना काही नागरिकांनी राष्ट्र सह्याद्रीशी बोलताना व्यक्त केली आहे.

दारू दररोज, दूध दिवसाआड!

लॉक डाउन काळात अनेक अत्यावश्यक गरजा भागवताना सामान्य माणसाची तारांबळ होते. दूध वितारणावर मर्यादा आल्याने अनेक भागात दिवसाआड दूध मिळते. लहान बाळांच्या संगोपनाची समस्या त्यामुळे भेडसावत आहे. अशा स्थितीत राज्य शासनाच्या निर्णयामुळे दारूविक्री सुरू झाली आहे. दूध दिवसाआड मिळत असताना दारू मात्र दररोज दिवसभर मिळते. खासदार इम्तियाज जलील यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी दारूविक्री विरोधात भूमिका घेतली असली तरी चोरट्या मार्गाने दारूविक्री सुरूच आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here