Rahuri : राज्यात सर्वात प्रथम कर्ज माफीत पात्र ठरलेल्या ब्राह्मणीत शेतकऱ्यांना नवीन कर्ज वितरण सुरू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

ब्राह्मणी – महात्मा फुले कर्ज माफी योजनेसाठी प्रातिनिधिक स्वरूपात नगर जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या ब्राह्मणीतील कर्जमाफी लाभार्थींचा सात बारा कोरा झाल्यानंतर पुन्हा नवीन कर्ज वितरण करण्याची कार्यकाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती ब्राह्मणी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव अशोक आजबे यांनी दिली.

आतापर्यंत शंभरहून अधिक प्रस्ताव प्राप्त झाले असून ३० शेतकऱ्यांच्या खाती पहिल्या टप्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे. ६० टक्के रक्कम रोख स्वरूपात तर, ४० टक्के एटीएमद्वारे (रूपे किसान क्रेडिट कार्ड) देण्यात येणार आहे. सुरू ऊसासाठी एकरी ३८ हजार व खोडव्यासाठी ३१ हजार रुपये कर्ज देण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सर्व जण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतानाच शेतकरी बांधवांच्या हितासाठी सोसायटी कर्मचारी सोशल डिस्टन्स पाळून कर्ज वितरणासाठी प्रयत्नशील आहेत. इन्स्पेक्टर अरुणराव पटारे, गोवर्धन जनार्धन बानकर, हरिभाऊ धोंडीराम हापसे, एकनाथ पांडुरंग घोडके, पांडुरंग गोरक्षनाथ हापसे, बापूसाहेब नामदेव ढेपे, सोपान रामदास देशमुख, मंजबापू घुगरे आदी कर्ज वितरणसाठी शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करून घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here