Shevgaon : तालुक्यातील 95 स्वस्त धान्य दुकानदारांचे सामुहिक राजीनामे; तालुक्यात एकच खळबळ

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शेवगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर कोणतीही पूर्व सूचना, नोटीस न देता खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी 5 मे रोजी सामूहिक राजीनामे प्रभारी तहसीलदार मयूर बेरड यांचेकडे दिले आहे.
स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मागील काही दिवसापासून काही लोकांच्या खोट्या तक्रारीच्या आधारे वस्तुस्थितीची माहिती न घेता सर्व दुकानदारांना कोणतीही पूर्व नोटीस अगर सूचना न देता प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते.
ही बाब नैसर्गिक न्यायपद्धतीची पायमल्ली करणारी आहे. हे वास्तविक सदर तक्रारीबाबत स्वस्त धान्य दुकानदारांची असे म्हणणे आहे की, वार्षिक साठा पत्रकात बदल करून खोट्या तक्रारी बनावट साठा पत्रक पुरावे म्हणून सादर केले आहे. सदरचे मूळ तक्ते प्रत्येक दुकानदाराकडे उपलब्ध आहेत. डी बी बिहानी यांचे दुकानाचा परवाना सुमारे 9 महिन्यापासून निलंबित आहे. मात्र तरीदेखील वयोवृद्ध दुकानदार डी.बी बीहानी यांचे नावे काही लोकांकडून वैयक्तिक आकसापोटी वारंवार तक्रारी करण्यात येतात.
खोट्यानाट्या तक्रारीच्या आधारे कोणतीही तपासणी न करता अगर कोणतीही लेखी नोटीस न बजावता प्रशासनाकडून स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आज शेवगाव तालुक्यातील 95 स्वस्त धान्य दुकानदारांनी सामूहिक राजीनाम्याचे पत्र शेवगावचे प्रभारी तहसीलदार मयूर बेरड यांच्याकडे दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here