Ahmednagar : पोलिसांचा गुंडांना सलाम, पञकारांना कायद्याचा बडगा

प्रतिनिधी | राजेंद्र उंडे | श्रीरामपूर

अहमदनगर – जिल्ह्यात अवैध धंद्याची पोलिसांच्या आशीर्वादाने चलती असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून ते पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर गुन्हेगारीतील व्हाईट कॉलरांबरोबर उठबैस असल्याने त्या गुंडांना पोलिस राजरोसपणे सलाम करतात. तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पञकारांनी पोलिसांवर शब्दाचे आसूड ओढले की, पोलिस या ना त्या प्रकारे कायद्याचा बडगा दाखविण्याचे शौर्य गाजवित आहे. हाच कायद्याचा बडगा गुंडराज व अवैध धंदे पोलिसांनी उगारला तर जिल्हा गुन्हेगारी मुक्त होईल. परंतू पोलिसांनी ज्या ठिकाणी शौर्य दाखविण्याची गरज आहे. तेथे माञ सलाम ठोकतात. गरज नाही त्या ठिकाणी माञ कायद्याचा बडगा उगारुन आपणच कसे कायद्याचे रक्षक आहोत. हे दाखविण्यासाठी शौर्याची लढाई लढतात.

जिल्ह्यात अवैध धंद्यांना उधाण आले आहे. वाळू तस्कारांपासून ते मटका, गावठी दारुच्या अवैध धंद्यात प्रत्येक ठिकाणी गुंडाराज असून या गुंडाराज यांच्या आशीर्वादाने अवैध धंदे जोमाने चालू आहे. गुंडराजांना पोलिसांचा आशीर्वाद असल्याने तेही मनमानी पद्धतीने धंदे करण्यास लावून आपली झोळी भरताना पोलिसांची झोळी भरतात जिल्ह्यात पोलिसांची झोळी भरणाऱ्या गुंडाराज पैशालाही बोलण्यास लावत असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात हाच प्रकार असल्याने व्हाईट कॉलर गुंडांना पोलिस सलाम ठोकतात तर सर्व सामान्य नागरिकांना माञ काठीने ठोकतात. कायदा सर्व सामान्याचे रक्षण करतो, असे फक्त बोलण्यापुरते किंवा कागदावर लिहिण्यासाठी चांगले वाटते. परंतू कायदा सर्वसामान्यांचे रक्षण करीत नसून गुंडाराजांचे रक्षण करतानाच दिसत आहे.

कोरोनो पार्श्वभूमीवर राज्यात सर्वञ लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये पोलिसांनी वृत्तांकन करणाऱ्या पञकारांना मारहाण केली असल्याची माहिती सोशल मीडियामुळे समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका दैनिकाचे उपसंपादक दीपक उंडे यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रताप खुद्द पोलिस निरीक्षकाने केला आहे. यापूर्वी विठ्ठल शिंदे, संदीप रोडे, अन्सार सय्यद यांच्यावर पोलिसांनी बळाचा वापर केला होता. तर कालची ताजी घटना दारु खरेदीसाठी तळीरामांची उडालेली झुंबड याचे छायचिञण व वृत्तांकन एका दैनिकाचे संपादक सुभाष चिंधे हे करीत असताना आव्हाड नामक पोलिसाने फोटो घेण्यास मज्जाव करत गुन्हा दाखल करण्याची कायद्याची भाषा वापरत धक्काबुकी करण्यापर्यंत मजल गेली पञकारांनी छायचिञ घेण्यापूर्वी सोशल मीडियावर  छायचिञ व व्हिडिओ प्रसारीत झाला होता. त्यावेळी पोलिसाला छायाचित्रे घेणारे दिसले नाही का? यावरुन जाणीवपूर्वक पञकारास कायद्याची धमक दाखवण्याचे शौर्य पोलिसाने केलेआहे.

दारु वाटपाच्या बंदोबस्तासाठी असणाऱ्या त्या पोलिसाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला आहे. उपस्थित तळीरामांनी सोशल डिस्टन्स पाळला नाही. त्यावेळी कायद्याचा 188 कलम पोलिसाला आठवला नाही का? वास्तविक पाहता त्या पोलिसाने सोशल डिस्टन्स ठेवण्यास प्रवृत्त केले नाही. जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने त्या पोलिसावर जिल्हाधिकारी यांनी गुन्हा दाखल का केला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध धंद्याना पोलिसांचा आशीर्वाद असल्याने जोमात चालू आहे. प्रत्येक अवैधधंद्याकरिता स्वतंञ गुंडाराज आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात या गुंडाराजांना सन्मानाची वागणूक दिली जातेच. पोलीस ठाण्यात त्यांना त्या पोलिस अधिकाऱ्यांजवळ बसण्यासाठी स्वतंञ आसन व्यवस्था केली जाते. सर्वसामान्यांना माञ केराची उलटी टोपली दाखवली जाते.

नगर जिल्ह्यात नव्याने दाखल झालेले पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्यापुढे जिल्ह्याच्या राजकारणा बरोबरच वाळू तस्करी अवैध धंदे, गुंडाराज ही गुन्हेगारी पुढे असली तरी बगलबच्चे अधिकारी माञ जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. पोलिसांची झोळी भरविणाऱ्याची अधीक्षक यांची खास ओळख करुन देण्यास काही अधिकरी पुढारी अग्रेसर आहेत. परंतू पोलीस अधीक्षक यांच्यासमोर मोठी गुन्हेगारी व अवैध धंदे, वाळू तस्करीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक पोलीस ठाण्यात गुन्हेगारीचा आलेख कमी दाखविण्यासाठी अनेक गुन्हे कागदावर येऊ दिले जात नाही.

यातून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या समोर गुन्हेगारी कमी दाखविण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा  प्रयत्न असतो. जिल्ह्यातील पोलिस गुंडाराजसाठी पायघड्या टाकण्यास कमी करणार नाहीत. सर्व सामान्यांना माञ कायद्याच्या बडग्याखाली दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून जिल्ह्याची गुन्हेगारी कमी न होता वाढत जाणार आहे. त्यामुळे नव्या पोलीस अधिक्षकांसमोर गुन्हेगारीचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे. असेच चालले तर जिल्हा पोलिस अधीक्षक वादग्रस्त ठरण्यास वेळ लागणार नाही.

पञकारांच्या अनेक संघटना,एकमत नाही.
राज्यभर पञकारांच्या अनेक संघटना कार्यरत आहेत. संघटनेचा अध्यक्ष माझी संघटना कशी चांगली हेच दाखविण्यासाठी स्पर्धा करीत आहे. पञकारांवर पोलिसांकडून लाठी हल्ला होतो, अपमानास्पद वागणूक दिली जाते. कायद्याचा बडगा उगारला जातो. त्यावेळी पञकार संघटना जागृत होतात सोशल मीडियावर गुन्हा दाखल, निलंबित करा, अशा मागण्या केल्या जातात. परंतू जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासमोर कैफीयत मांडताना चढाओढ निर्माण होते. परंतू याचे श्रेय कोणत्या संघटनेस जाऊ नये म्हणून अधिकाऱ्याची हांजी हांजी करणारे त्या पञकारास माघार घेण्यास लावून आपली कॉलर उंच ठेवण्यासाठी धडपडत असतात. पञकार संघटनात एकी नसल्याने अधिकाऱ्यांचे पथ्यावर पडत आहे. सर्व संघटना एकञ आल्या आणि एकी ठेवली तर पोलिसच काय पण कोणीही पञकारास धक्का लावण्याचा प्रयत्न करणार नाही.

झिरो पोलिसांची चमकोगिरी
जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यात झिरो पोलिसांची चलती आहे. पोलिस ठाण्याचा कारभार झिरो पोलिस पाहत आहे. कोणत्या अवैध धंद्यावर कारवाई करायची. कोणत्या वाळू तसस्करावर कारवाई करायची, कोणत्या वाळू तस्करास  सोडून द्यायचे. अवैध धंदे कोणाचे बंद करायचे हे सर्वश्री झिरो पोलिसांच्या हातात असते. झिरो पोलिस कोणत्या गुंडाराजास सलाम ठोकायचा याची माहिती त्याच्याकडून दिली जाते. यातुन झिरो पोलिस चमकोगिरी साधून घेतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here