Beed : जिल्ह्यातील सर्व बँका ७ व ९ मे २०२० रोजी चालू ठेवाव्यात – जिल्हाधिकारी राहुल रेखावार 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड – जिल्ह्यातील सर्व बँका दिनांक ७ मे २०२० व ९ में २०२० रोजी संचारबंदीच्या शिथिल कालावधीत नागरिकांसाठी चालू ठेवाव्यात. तसेच सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पास प्राप्त करुन घेतले आहेत. त्या संबंधित व्यक्ती यांना बँकेच्या सर्व सोई-सुविधा या दिनांकास बँकेच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात याव्यात वरील सुट्टींच्या कारणामुळे बाधा येऊ न देता या बँकांचे कामकाज चालू ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार दिनांक ७ में २०२० रोजी बुद्ध पोर्णिमा व दिनांक ०९ में २०२० रोजी दुसरा शनिवार निमित्त सुट्टी जाहीर केली असून दोन दिवस बँक बंद राहिल्याने तसेच या दोन्ही विषम दिनांकास बँका बंद राहिल्यामुळे सदर परिस्थितीच्या कालावधीत लोकांना आर्थिक व्यवहार करणेस अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. याकरिता विषम दिनांकास संचारबंदीतून सकाळी ७ ते सकाळी ९ . ३० या वेळेत शिथिलता देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादडांधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४ (१) (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. यामुळे या आदेशासह यापूर्वीचे आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश अमंलात राहतील, असे निर्देशीत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here