Kada : प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे जनतेने पालन करावे – विजय कबाडे

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कडा – कोरोनापासून बचाव करण्यासाठी जनतेने विनाकारण घराबाहेर न पडता स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच प्रशासनाने घालूल दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी आष्टीच्या भेटी दरम्यान केले आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आष्टीसह अंभोरा पोलिस चेक पोस्टला भेट देऊन तालुक्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिका-यांचा ऑनलाईन पास असल्याशिवाय कुठलेही वाहन जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर सोडले जाणार नाही, पोलिसांनी सतर्क राहून दक्षता घेण्याबाबत कठोर शब्दात सुचित केले. तसेच नगरसह जामखेडही कोरोना बाधित शहर असल्यामुळे आष्टी तालुक्यातून होणारी वाहतूक जिल्हाधिका-यांचा आदेश असल्याशिवाय होणार नाही.

त्यामुळे आष्टीसह अंभोरा, दौलावडगाव, पांढरवाडी हातोला, वाकी, खडकत चेकपोस्ट व इतर छुप्या मार्गाने बीड जिल्ह्यात कुठलेही वाहन विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करणार नाही, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना देखील ऑनलाईन परवाना आवश्यक असल्याचे कबाडे यांनी चेक पोस्टवरील कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देऊन सांगितले. चेकपोस्टवर जर कुणी विनापरवाना एखादे वाहन सोडल्यास त्यांच्यावर covid-19 आपत्ती व्यवस्थापना कायद्यांतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

याप्रसंगी त्यांच्या समवेत उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे, अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर कुकलारे, चेक पोस्ट वरील कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील वाढत्या चोरीच्या घटनांसहित अवैद्य धंद्यांबाबत काही गंभीर तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहचल्यामुळे कबाडे साहेबांनी आष्टी भेटी दरम्यान स्थानिक पोलिस अधिका-यांची चांगलीच खरडपट्टी केली असल्याची चर्चा पोलिस ठाण्यातील कर्मचा-यांत दबक्या आवाजात झाल्याचे बोलले जात आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here