Shrigonda : श्रीगोंद्यात खळबळ; कोरोना शंकास्पद रुग्णाचा मृत्यू

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – शहरात कोरोना शंकास्पद रुग्णाचा मृत्यू झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून शहरातील  परिसरात नागरिकांनी काळजी घेऊन घाबरून न जाण्याचे आवाहन तालुका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

श्रीगोंदा शहरात एक व्यक्ती एका भयंकर आजाराने अनेक दिवसापासून त्रस्त असल्यामुळे तसेच त्या व्यक्तीस मध्यंतरी जास्त प्रमाणात ताप येऊ लागल्याने श्रीगोंदा तालुक्यातील आरोग्य विभागाकडून त्याच्या घशातील श्राव तपासणीसाठी घेण्यात आला होता. आणि त्याचे नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, अहवाल प्राप्त होण्याच्या आगोदरच त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने परिसरात शंकाचे काहूर माजले आहे. मात्र, त्या व्यक्तीचा अजून कोणताही अहवाल प्राप्त झाला नसल्याने आरोग्य विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती कोरोना बाधित होता की नाही हे समजणार नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे तालुका आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांनी याबाबत सजग राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाकडून करण्यात आले आहे
सायंकाळी ४ वाजेपर्यंत अहवाल प्राप्त होतील – तालुका आरोग्य अधिकारी श्रीगोंदा शहरातल्या  कोरोना शंकास्पद रुग्णाचा मृत्यू झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत श्रीगोंदा तालुका आरोग्य अधिकारी नितीन खामकर याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, साधारण सायंकाळी ४ वाजेपर्यंत अहवाल प्राप्त होतील. त्यानंतर मयत व्यक्ती बाधित होती का नाही हे समजून येईल. त्यामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, खबरदारीचे उपाय नागरिकांनी अवलंबवले पाहिजेत, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here