National Breaking : Andhra Pradesh : विशाखापट्टणम येथील एलजी पॉलिमर इंडिया कंपनीत विषारी गॅसची गळती; एका लहान मुलासह आठ जणांचा मृत्यू

1

भोपाळ दुर्घटनेनंतर ही दुसरी मोठी गॅस गळती दुर्घटना आहे

जवळपास 1000 नागरिक आतापर्यंत यामुळे आजारी 

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथील एलजी पॉलिमर इंडिया कंपनीत विषारी गॅस गळतीची दुर्घटना आज घडली. यामध्ये आतापर्यंत एका लहान मुलासह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 1500 ते 2000 जण यामुळे आजारी पडले आहे.

आतापर्यंत जवळपास 200 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

1961 मध्ये हिंदुस्थान पॉलिमर या नावाने स्थापित या कंपनीला दक्षिण कोरियाच्या एलजी केमिकल्स या कंपनीने खरेदी केले होते. त्यानंतर 1997 मध्ये या कंपनीचे एलजी पॉलिमर इंडिया या नावाने रुपांतरिक केले गेले. या प्लांटवर पॉलिस्टाईनिन आणि एक्सपेंडबल पॉलीस्टार्न बनाता है.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here