Maharashtra : औरंगाबादजवळ थकून पटरीवरच झोपलेल्या 14 मजूरांचा मालगाडी खाली येऊन मृत्यू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

पहाटे सव्वापाचच्या सुमारास घडली घटना 

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात परभणी-मनमाड सेक्शनजवळ एका मालगाडी खाली येऊन 14 ते 16 मजूरांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी सव्वापाच वाजता घडली. या घटनेबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच रेल्वे मंत्री पियूष गोयल या घटनेचा आढावा घेत आहेत.

हे मजूर जालना येथील एका स्टीलच्या फॅक्ट्रीत काम करत होते. मात्र, सरकार मजुरांना रेल्वेद्वारे आपआपल्या राज्यात पाठविण्याच्या प्रयत्नात आहेत हे समजल्यानंतर ते सर्व औरंगाबादला जायला निघाले. रात्रीच्या वेळी बदनापूरजवळ परभणी मनमाड सेक्शन येथील रेल्वे पटरीवर थकून झोपून गेले. सध्या रेल्वेगाड्या बंद असल्याने गाडी येणार नाही, असे समजून रेल्वे पटरीवरच झोपलेल्या 21 मजूरांवर काळाने मात्र घाला घालायचे ठरवले.

पहाटे सव्वापाच वाजता या मार्गावरून मालगाडी येणार होती. मालगाडीच्या पायलटला लोक पटरीवर झोपले आहे. हे समजल्यानंतर लोका पायलटने गाडी थांबविण्याचे प्रचंड प्रयत्न केले मात्र तरीही मजूर गाडीखाली आले. मजुरांना औरंगाबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेत हाती आलेल्या वृत्तानुसार 14 मजुरांचा मृत्यू झाला इतरांवर उपचार सुरू आहे.

205 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here