Shrigonda : बोगस दाखल्यामुळे त्या सेतू चालकावर होणार कारवाई…

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
 
श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रामधून सेतू चालक कृष्णा थोरात याने गावातील एका महिलेच्या नावावर १ वर्षाच्या उत्पन्नाच्या दाखला देण्यासाठी गावातीलच एका इसमाचे बोगस कागतपत्रे जोडून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून लॉकडाऊन काळात देखील उत्पंनाचे बोगस दाखल्याचे प्रकरण तयार करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशास केराची टोपली दाखवत शासनाची फसवणूक केली असून या प्रकरणी तहसीलदार महेंद्र माळी यांना विचारले असता त्यांनी सदर प्रकरणाची मंडळ अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून सेतू चालकावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली.
याबाबत सविस्तर असे की कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्र बंद करण्याचे आदेश दिले असताना कोळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या सेतू केंद्रातून केंद्र चालक कृष्णा थोरात याने दि.२७ एप्रिल रोजी गावातील एका महिलेच्या नावावर १ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी गावातीलच दुसऱ्या इसमाचे तलाठी उत्पन्न दाखला, रेशन कार्ड, तलाठी रहिवाशी असे बोगस कागतपत्रे जोडून प्रकरण तयार करून ऑनलाईन तहसील कार्यालयात डिजिटल सहीसाठी पाठविण्यात आले. त्या कागद पत्रांची तहसिलदारांकडून तपासणी करण्यात आली असता त्या दाखल्यासाठी बोगस कागदपत्रे जोडण्यात आल्याचे दिसून आले असून या प्रकरणी तहसीलदार महेंद्र माळी यांना विचारले असता त्यांनी सदर प्रकरणाची मंडल अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून संबंधित सेतू चालकावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली.
अशाप्रकारचे बोगस दाखल्याचे प्रकरण यापूर्वीही या केंद्र चालकाने पाठवले असल्याचे कळले असून त्यावेळी देखील त्याला तहसील कार्यालयाकडून समज देण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त समजते. मात्र, दरवेळी होणारी चूक त्याने लॉकडाऊनच्या काळात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यादेशाची अवहेलना करत केल्यामुळे त्याच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे तालुक्यातील इतरही सेतू चालकाकडून बोगस प्रकरणे तयार करून तहसील कार्यालयात पाठविण्यात येत असल्याने त्याच्यावरही कारवाई होणे गरजचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here