पुण्यातील ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी , कमी दरात मिळणार ड्राय केलेला भाजीपाला
प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

पुणे ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांच्याकडून ग्राहकांची व शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू झाली आहे. या काळात ग्राहकांनी ताजा भाजीपाला घेण्याऐवजी ड्राय केलेला भाजीपाला कमी दरात घेऊन कुटूंब चालवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कमी दरात आणि दिर्घकाळ टिकणारा वाळलेला भाजीपाला खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भाजीपाल्यासाठी रोज बाहेर न जाता एकदाच ग्राहकांनी असलेली गरज भागवण्यासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरातील ग्राहकांनी वाळलेला भाजीपाला (ड्राय केलेला) खरेदी करावा, असे आवाहन ग्रामीण तंत्रज्ञान संस्था संचालित आनंदघना इंडस्ट्रीजचे अध्यक्ष
गिताराम कदम यांनी केले आहे.
ग्रामीण तंत्रज्ञान संस्था संचालित आनंदघना इंडस्ट्रीज ने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. गीताराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेने निर्णय घेतला आहे की आपल्या नियमित उत्पादनांसोबत सुकवलेल्या फळभाज्या आणि पालेभाज्या बाजारात उपलब्ध करून दिले आहे. हा शेतमाल नाविन्यपूर्ण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सुकविल्याने शेल्फ लाईफ (टिकाऊपणा) तीन ते सहा महिने पर्यंत टिकला जातो. तसेच त्याची पोषकतत्वे अबाधित राहिली जातात.
सध्या या कोरोनारुपी संकटात प्रत्येकालाच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य पोषक आहाराची गरज आहे. यामध्ये हायजिनची पूर्ण काळजी घेऊन उत्पादित केलेल्या फळे आणि पालेभाज्या ग्राहकांना पोषण तत्वांच्या संपुर्ण माहितीसह पुरविल्या जाणार आहेत. यामध्ये पालक, कोथंबीर, टोमॅटो, मेथी, गवार, वांगे अशी विविध स्वरूपातील भाजीपाला यासह पावडर स्वरूपातही ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
सध्याच्या या नव्या कोरोनरुपी संकटामुळे यात आणखी भर पडली आहे, परिस्थिती भयावह झाली आहे. एकीकडे शेतमाल पडून आहे तर दुसरीकडे नागरिकांना ते योग्य पध्दतीने पोहचू शकत नाहीये, पोहोचले तरी तो शेतमाल (पालेभाज्या, फळभाज्या) निर्जंतुक आहे की नाही याची शाश्वती नाही. शिवाय रोज ताजी भाजी घेण्यासाठी लोक घराबाहेर पडण्याचा धोका पत्करत आहेत जे सद्यपरिस्थितीत अतिशय अयोग्य आहे. अशाप्रकारे सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात जास्त काळ टिकणाऱ्या फळभाज्या आणि पालेभाज्या उपलब्ध होऊ शकणार आहेत. जेणेकरून कुणालाही सारखे घराबाहेर न जाता जास्त काळासाठी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत आहे. यामध्ये मेथी, पालक, कोथिंबीर, शेवगा, बीट, आले, लसूण, लिंबू, कांदा, मिरची यांचा समावेश आहे. हा शेतमाल (फळभाज्या आणि पालेभाज्या) किराणा माल आणि मेडिकल दुकाने, सहकारी हौंसिग सोसायटीमध्ये उपलब्ध करून देत आहोत, याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी गीताराम कदम : ९९२२९४६५४० विकास कात्रे: ९८३३७४५४४० शरद पाबळे: ९८२२०८३१११ या क्रमांकावर संपर्क साधावा.