Shrigonda : तालुक्यातील कोळगावात सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी; दोरीने गळा आवळून खून 

0

खून करून आत्महत्येचा केला होता बनाव; २४ तासात बनाव उघडकीस आणून आरोपी जेरबंद

प्रतिनिधी | श्रीगोंदा

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील सख्ख्या भावाने दोरीने गळा आवळून भावाचा खून केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासाच्या आत बेलवंडी पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले आहे. मात्र, आतापर्यंत सिनेमा तसेच नाटक यामध्ये पाहिलेल्या सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी या घटनेचा प्रत्यय तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी पाहण्यास मिळाला आहे, असे खुलेआम बोलले जात आहे. 

सोन्याबापू दळवी, असे मयताचे नाव असून गणेश दळवी, असे आरोपीचे नाव आहे. दोघेही सख्खे भाऊ आहेत. खून करून गणेश याने सोन्याबापू याने आत्महत्येचा केली, असा बनाव रचला होता. मात्र, प्रकरण शंकास्पद असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासात हा बनाव उघडकीस आणून आरोपी गणेश याला जेरबंद केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोन्याबापू दळवी हा दारू पिऊन आल्यानंतर तो आपल्या घरातील आई वडिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मोठ्या प्रमाणात मारहाण करत असे. असे करू नकोस ते आपले आई वडील आहेत त्यांना असा त्रास देणे उचित नाही, असे सोन्याबापू याचा सक्खा भाऊ गणेश दळवी त्यास कायम समजावून सांगत असे. मात्र, डोळ्यात मदिराची नशा तसेच व त्यानेच चिन्न झालेले डोके त्यामुळे भावांनी घातलेली साद त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हती. त्यामुळे अनेकदा सांगूनही आपला भाऊ ऐकत नाही त्या गोष्टीने त्रागा झालेल्या भावाने म्हणजे गणेश दळवीने भांडणे सोडवताना भाऊ ऐकत नसल्यामुळे रागाच्या भरात घरात पडलेल्या एका साहाय्याने गळा आवळून सोन्याबापू दळवी यांचा खून केला आणि सर्व पुरावे नष्ट करून याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात आपला भाऊ हा गळफास घेऊन मयत झाल्याची खबर दिली.
मात्र, हे प्रकरण सुरुवातीपासून पोलिसांना शंकास्पद वाटत आल्यामुळे बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी तपासाची चक्रे फिरवली असता त्यांना घरातील लोकांवर शंका निर्माण झाली आणि त्यांनी घरातील लोकांची तपासकामी उलटतपासणी घेतली असता त्यांना आरोपीचा भाऊ याने जबाबात सांगितले की त्याने दारूच्या नशेत झोपेतच आत्महत्या केली.
मात्र, मयताच्या आईने दिलेल्या फिर्यादीत त्यांनी म्हटले की दोन भावाची भांडणे झाली. सोन्याबापू मयत झाला असे फिर्यादीत म्हटल्यावर पोलिसांनी तात्काळ आरोपीस अटक केले. गणेश दळवी यावर भादंवि ३०२ २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात कोळगाव या ठिकाणी सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी, असे नागरिकातून बोलले जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here