Kada : पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी वाहनचालकांची तोबा गर्दी

2
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कडा – संचारबंदी शिथिलतेच्या कालावधीत पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी इंधन भरण्यासाठी तोबा गर्दी केली. त्यामुळे ग्राहकांना शिस्तीत इंधन वाटप करण्यासाठी पेट्रोलपंप चालकांना पोलिसांची मदत घ्यावी लागली.

कडा येथील नगर-बीड महामार्गावरील एका पेट्रोलपंपावर गुरुवारी संचारबंदी शिथिलतेच्या सकाळी सात ते साडेनऊ या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील भाजी विक्रेत्यांसह इतर शेकडो ग्राहकांनी आपापल्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी लांबपर्यंत रांगेत प्रचंंड गर्दी केेली होती.
त्यामुळे पेट्रोलपंपावरील कर्मचा-यांची देखील काहीवेळ मोठी तारांबळ उडाली. त्यामुळे पेट्रोलपंपावरील कर्मचा-यांना अरेरावी करणा-या काही बेशिस्त वाहनधारकांना आवर घालण्यासाठी पंपचालकांना अखेर पोलिसांना पाचारण करून त्यांची मदत घ्यावी लागली.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here