National : जेईई अॅडव्हान्स परीक्षा 23 ऑगस्ट रोजी

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जेईई अॅडव्हान्स अर्थात जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. 17 मे रोजी ही परीक्षा होणार होती. आता ही परीक्षा 23 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटीच्या प्रवेशासाठी जेईई परीक्षा घेतली जाते. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने गुरुवारी याविषयी घोषणा केली.

मानव संसाधन विकासमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी याविषयी माहिती दिली. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली असून 23 ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेण्यात येईल. तर जेईई मेन्स 18 ते 23 जुलै दरम्यान घेण्यात येईल, अशी घोषणा यापूर्वी मंगळवारीच करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here