Maharashtra : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आनंददायी बातमी; अंतिम सत्राची परीक्षा सोडून सर्व परीक्षा रद्द; थेट पुढच्या वर्षात प्रवेश

0

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा निर्णय

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आनंददायी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या केवळ अंतिम सत्रांच्या परीक्षा जुलैमध्ये होणार असून अन्य सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्षात प्रवेश देण्यात येणार आहे.

मात्र, मागील वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात मागील पेपर देणेही बंधनकारक राहणार आहे. तसेच जे विद्यार्थी गुणांची सरासरी वाढवू इच्छितात तेही मागील पेपर पुन्हा देऊ शकतात.

मात्र, अंतिम सत्राच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार असून लॉकडाऊनची परिस्थिती पाहून 20 जून रोजी बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईन. असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here