Rahuri : तळीरामांना दारु मिळाली पण घशात उतरलीच नाही

पोलिसांच्या वाहन तपासणीत भेदभाव; दारुची वाहने केली जप्त

प्रतिनिधी | राजेंद्र उंडे

राहुरी – अहमदनगर शहरात दारू दुकान सुरु होताच उत्तर भागातील अनेक दारुशौकीन तळीरामांनी नगर गाठत आपल्या मद्याची सोय करत अनेक दिवसाचा स्टॉक घेऊन परत आपल्या गावी येत असताना राहुरी येथे नगर मनमाड रोडवर वाहन तपासणी करणा-या पोलिसांनी वाहन तपासणी करत असताना अनेक चारचाकी वाहनात मद्याचे खंबेच्या खंबे गाडीत टाकून पार्सल चालवले होते. गाडीत दारुचे बॉक्स दिसताच सर्व वाहने पोलीस ठाण्यात आणून जप्त केली. सरकारने दारु दुकाने उघडी केली पण तळीरामांच्या आनंदावर विरजण पडले. आई जेवू घालीना, बाप भीक  मागू देईना, अशी अवस्था तळीरामांची झाली आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे, अशा परिस्थितीत सरकारने दोन दिवसांपूर्वी दारू विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्येक जिल्ह्याची व तालुक्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निर्णय घेण्याचे अधिकारी सरकारने दिले आहेत. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राहुरी तालुक्यातील तहसीलदार फसिओद्दीन शेख यांनी दारू विक्रीला परवानगी दिली नाही. त्यामुळे तळीरामांना मोठे हाल सहन करावे लागत आहे. त्यावर पर्याय काढत नगर येथून दारु खरेदी करुन वाहनातून घरी नेण्या पूर्वीच ग्रहण लागले.

नगर महामार्गावर ही कारवाई चालू असताना अनेक प्रतिष्ठीतांनी गाड्या सोडण्यासाठी फोनाफोनी करून मध्यस्ती करण्याचा प्रयत्न सुरु होता. सुरुवातीला पोलिसांनी दुर्लक्ष करत गाड्या लावून घेतल्या पण नंतर मात्र पोलीस स्टेशनला गाड्या आणताना काही गाड्या परस्पर सोडून दिल्याने पोलीस कारवाई वर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे ?कोणाच्या सांगण्यावरून या गाड्या सोडल्या की काही आर्थिक तडजोड झाली या बाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु होती. तर ज्यांच्या गाड्या जप्त करून पोलीस स्टेशनला आणल्या त्यांनी नाराजी व्यक्त करत एकाला एक व दुसऱ्याला एक न्याय राहुरी पोलिसांनी का दिला ? असा प्रश्न उपस्थित पकडलेल्या वाहनधारक करत होते.

नगर येथून दारुचे बॉक्सचे पार्सल चारचाकी वाहनांमधून नगरमार्गे राहुरीकडे येत असताना नाका बंदोबस्तावरील  तपासणी न होता काही वाहने सुटलेच कसे, असाही सवाल उपस्थित होत आहे. राहुरीत चेकनाक्यावर पकडलेल्या वाहनांपैकी पाच ते सहा वाहने दारुसह पकडली. मात्र, काही वाहने सोडून दिल्याचीही चर्चा होत आहे. सदरील वाहने कुणाच्या आदेशाने सोडली. पोलीस ठाण्यात आणण्यात आलेली वाहने एम एच १७ बी व्ही १४४६, एम एच १७ बी व्ही ५९४३, एम एच १७ ए झेड ९३५१, एम एच १७ ए झेड २२४२ तसेच एम एच १७ बी एक्स २०२१ ही पाच वाहने ताब्यात घेतली आहे. तसेच हजारो रूपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक  मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी खरात, सोमनाथ जायभाये, आजिनाथ पाखरे, अशोक कोळगे यांनी कारवाई केली  केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here