Shrirampur : शहरात अन्नछत्र सुरू करण्याचा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा निर्णय

0

खासदार डॉ.सुजय विखे पाटील अध्यक्ष असलेल्या मुळा-प्रवरा वीज वितरण संस्थेचा पुढाकार

आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शन

श्रीरामपूर – कोरोनामुळे भरडलेल्या श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील नागरिकांना आमदार राधाकृष्ण विखे पाटील,  माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलासा देण्यासाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. श्रीरामपूर शहर व तालुक्यात अन्नछत्र सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी पंचायत समिती मा.सभापती दीपक पटारे, जि. प.सदस्य शरद नवले, नानासाहेब शिंदे, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, संदीप चव्हाण, मुळा प्रवराचे कर्पे साहेब, गलांडे साहेब आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील नागरिक कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने गरिबांचे खाण्यापिण्याचे हाल सुरू झाले आहेत. त्यामुळे खा.डॉ.सुजय विखे पाटील अध्यक्ष असलेल्या मुळा प्रवरा वीज वितरण संस्थेच्या माध्यमातून श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड येथील शुभम मंगल कार्यालय, बेलापूर येथील सद्गुरू मंगल कार्यालय येथे दि.१० मे २०२० पासून अन्नछत्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अन्नछत्र योजनेचा शुभारंभ आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांसह पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. याबाबत आढावा बैठक श्रीरामपूर शहरातील मुळा-प्रवरा वीज वितरण संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडली.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूरकरांच्या हितासाठी स्वागतार्ह भूमिका घेतल्याने गोर गरिबांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अन्नछत्रचा लाभ घेऊन सोशल डिस्टन्सचे नियम पाळावे, असे मत पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here