Karjat : साहेब या मोफत अल्पोपहार वाटप केंद्राचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

3

सावता परिषदेचा उपक्रम 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि ९

कर्जत : कर्जत येथे सावता परिषदेच्या वतीने शहरात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत “साहेब अल्पोपहारचे” उद्घाटन कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी करण्यात आले. या लॉकडाऊनच्या काळात सर्व हॉटेल व खानावळी बंद असल्याने अनेक लोकांची होणारी परवड काही अंशी थांबणार आहे.

कर्जत शहर आणि तालुका परिसरातील अनेक सर्वसामान्य नागरिक आवश्यक गरजेसाठी दवाखाना यासह बँकेतील पैसे काढण्यासाठी रोज शहरात येत असतात. यावेळी त्यांची होणारी परवड पाहता त्यांना तासनतास दवाखाना आणि बॅंकेसमोर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. कधी कधी वेळ जास्त लागत असल्याने त्यांना विना अन्न आणि पाण्यावाचून ताटकळत उभे राहावे लागत आहे. याच धर्तीवर गरजवंतासाठी कर्जत नगरपंचायतच्या नगरसेविका व सावता परिषदेच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा सोनमाळी यांनी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत साहेब अल्पोपाहार सुरू करत त्याचे उदघाटन शुक्रवारी आमदार रोहित पवार यांचे हस्ते करण्यात आले.
यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या आणि गरजवंतासाठी नाष्ट्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.लापशी, शिरा, खिचडी, उपीट यासारखे पदार्थ दररोज सकाळी ९ ते ११ या वेळेत मोफत वितरीत होणार असल्याची माहिती नगरसेविका मनिषा सोनमाळी यांनी दिली. यावेळी वृद्ध भूमिहीन शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष शब्बीरभाई पठाण, डॉ प्रकाश भंडारी, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष नाथा गोरे, चंद्रकांत बनकर, सुशील मराळ, अजय नेवसे, अक्षय तोरडमल, बंटी शिंदे, सद्दाम सय्यद, नाना क्षीरसागर, परशुराम क्षिरसागर, आकाश क्षिरसागर, ओंकार क्षीरसागर, वृषभ मगर, भीमा पखाले, संदीप क्षीरसागर, रवी क्षीरसागर, ऋषी क्षीरसागर आदी उपस्थित होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here