Maharashatra : मोफत एसटी बस प्रवासाबाबत सरकारचे घुमजाव? एसटीचा मोफत प्रवास राज्यांतर्गत नाही तर राज्यातील व राज्याबाहेरील अडकलेल्यांसाठी !

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

मोफत एसटी बस प्रवासाबाबत सरकारने रात्रीतच घुमजाव केले. परिवहन मंत्री अनिल परब यांनी शनिवारी दुपारी राज्यात अडकलेल्यांसाठी मोफत एसटी प्रवासाची घोषणा केली होती. मात्र, रात्रभरातच या निर्णयाबाबत सरकारने घुमजाव केले. सरकारने हा मोफत एसटी बस प्रवास राज्यात अडकलेल्या परमजूरांना त्यांच्या परराज्यातील सीमेवरून आणण्यासाठी आणि महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील मजूरांना त्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

सरकारच्या अशा घोषणेमुळे राज्यातील जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण कालच एका जिल्ह्यात अडकलेल्यांना दुस-या जिल्ह्यात जाण्यासाठी 18 मे पर्यंत ही सेवा देणयात येणार आहे, असे सांगितले होते. मात्र लगेचच हा निर्णय फिरवण्यात आला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here