Shrigonda : अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या देखील परीक्षा रद्द करा – खेतमाळीस

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा देखील रद्द करण्यात याव्यात आशा मागणीचे निवेदन, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाउपाध्यक्ष विजय खेतमाळीस यांनी “उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत” यांना पाठविले आहे!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा सोडून बाकी परीक्षा रद्द केल्या याबद्दल आभार मानत  अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष वेधले आहे. खेतमाळीस यांनी या निवेदनात म्हटले आहे, की संपूर्ण महाराष्ट्रात अंतिम वर्षातील विद्यार्थी 8 ते 9 लाख असून, बहुतांश विद्यार्थी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर इ ठिकाणांहून गावाकडे आलेले असून या सर्व विद्यार्थ्यांच्या मनात कोरोनाच्या भीतीच वातावरण आहे!

युजीसीच्या गाईडलाईननुसार जरी १ जुलै ते ३१ जुलैपर्यंत अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या तरी देखील विद्यार्थी व पालकांच्या मनात भीतीचं वातावरण असल्याने विद्यार्थी “गावाकडून शहराकडे” येण्याच्या मनस्थितीत नाहीत! या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी विनंती खेतमाळीस यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here