विधान परिषद निवडणूक : काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीत चिंता; निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न

0

21 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची उमेदवार मागे घेण्यासाठी थोरात यांच्याशी बोलणी

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने आपले दोन उमेदवार घोषित केल्याने महाविकास आघाडीत चिंता निर्माण झाली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची भूमिका आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची उमेदवार मागे घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क केला असल्याची सुत्रांची माहिती आहे.

तर बाळासाहेब थोरात मात्र, महाविकास आघाडीचे सहा उमेदवार आहेत त्यात काँग्रेसचे दोन आहे. सहा उमेदवार कसे निवडून आणायचे यावर विचार सुरू असून माझ्यावर कोणाचाही दबाव नाही, असे स्पष्ट केले आहे.

विधानसभेतील संख्याबळ पाहता सहावी जागा कशी निवडून आणायची यावर विचार सुरू आहे. महाविकास आघाडीचे विधानसभेचे संख्याबळ 171 असून विधान परिषदेतील 9 पैकी 6 उमेदवार निवडून आणण्यासाठी 174 संख्याबळ आवश्यक आहे.

भाजपने चार जागांसाठी आपले उमेदवार घोषित केले आहे. त्यामुळे एका जागेसाठी निवडणूक होणार. महाविकास आघाडीचा सहावा उमेदवार विधानसभेतील तटस्थ असणा-या पक्षांच्या मदतीने निवडून आणता येईल, असे काँग्रेसचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here